AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check | मोदी सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये देणार? खरं काय?

एका युट्यूबमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार ‘विधवा महिला समृद्धि योजना’ अंतर्गत सर्व विधवा महिलांच्या बँक खात्यात पाच लाख रुपये आणि फ्री शिलाई मशिन देत आहे.

Fact Check | मोदी सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये देणार? खरं काय?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Dec 11, 2020 | 4:26 PM
Share

मुंबई : युट्यूबवर (Youtube) प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला (PIB Fact Check) आहे की केंद्र सरकार ‘विधवा महिला समृद्धि योजना’(Widow Women Prosperity Scheme) अंतर्गत सर्व विधवा महिलांच्या बँक खात्यात पाच लाख रुपये आणि फ्री शिलाई मशिन देत आहे. पण, खरं सांगायचं तर हे सर्व साफ खोटं आहे. ही बातमी अफवा आहे. बारत सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल पीबीआयवरुन (PIB Fact Check) फॅक्ट चेक या बातमीचं खंडण केलं आहे.

दावा काय?

एका युट्यूबमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार ‘विधवा महिला समृद्धि योजना’ अंतर्गत सर्व विधवा महिलांच्या बँक खात्यात पाच लाख रुपये आणि फ्री शिलाई मशिन देत आहे (PIB Fact Check).

खरं काय?

पीबीआयने या व्हायरल पोस्टला खोटं सांगण्यात आलं आहे. “हा दावा खोटा आहे की केंद्र सरकारद्वारे ‘विधवा महिला समृद्धि योजना’ सारखी कुठलीही योजना चालवण्यात येत नाहीये”, असं पीबीआयने स्पष्ट केलं आहे.

यापूर्वीही अशाप्रकारे युट्यूबवर जारी एक व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, केंद्र सरकार ‘महिला शक्ति योजना’ (Mahila Shakti Yojana) अंतर्गत सर्व मंहिलांच्या खात्यात 60 हजार रुपये जमा करणार आहे. पीबीआयने या व्हायरल होणाऱ्या पोस्टला खोटं असल्याचं सांगितलं होतं. “हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारद्वारे महिला शक्ती सारखी कुठलीही योजना चालवण्यात येत नाहीये”, असं पीबीआयने सांगितलं आहे.

तुम्हीही करु शकता फॅक्ट चेक

जर तुम्हाला असा कुठलाही मेसेज आला असेल तर तुम्ही पीबीआयकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ई-मेल pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. ही माहिती पीबीआयच्या वेबसाईट https://pib.gov.in वर उपलब्ध आहे.

PIB Fact Check

संबंधित बातम्या :

RTGS सुविधेत ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या ग्राहकांना कसा मिळणार फायदा?

योगी सरकारचं 58 हजार महिलांना गिफ्ट, दर महिन्याला रोजगारासह 5200 रुपये कमवण्याची संधी

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ