तुम्ही दरमहा 30 हजार कमवूनही खर्च भागत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या
तुम्हीही तुमच्या पगारातून तुमचा खर्च भागवू शकत नसाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका मार्गाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा पगार व्यवस्थित मॅनेज करू शकता. चला जाणून घेऊया.

महिन्याला कितीरी पगार असला तरी कमीच पडतो, असं म्हटलं जातं. पण, तुम्ही एका गोष्टीचा कधी विचार केला आहे का की, तुमच्या पेक्षा कमी पगार असलेले लोकं देखील त्यांचं घर व्यवस्थित चालवतात. मग, त्यांना हे कसं शक्य होतं. खर्च वाचवण्याच्या नेमक्या कोणत्या ट्रिक्स आहेत, चला तर मग याविषयी जाणून घेऊया.
वाढती महागाई पाहता आजच्या लोकांना आपल्या पगारातून आपला खर्च भागवता येत नाही आणि तसे केले तरी महिन्याच्या शेवटी त्यांचे खिसे रिकामे होतात, ज्यामुळे महिन्याचा शेवटचा दिवस घालवणे खूप कठीण होते. जर तुम्हीही तुमच्या पगारातून तुमचा खर्च भागवू शकत नसाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका मार्गाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा पगार व्यवस्थित मॅनेज करू शकता. चला जाणून घेऊया.
30,000 रुपयांच्या पगाराचे व्यवस्थापन कसे कराल?
तुम्ही दरमहा 30,000 रुपये कमवत असाल आणि तुम्ही तुमचा खर्च भागवू शकत नसाल तर तुम्हाला आधी तुमच्या पगाराच्या 50 टक्के म्हणजेच 15,000 रुपये अत्यावश्यक खर्चासाठी काढावे लागतील. यामध्ये घरभाडे, पाणी व वीज बिल, घरशिधा, आरोग्य आणि वाहतूक यांचा समावेश आहे.
अत्यावश्यक खर्च
घरभाडे: सहा हजार रुपये
रेशन व इतर खर्च : पाच हजार रुपये
वीज-पाणी बिल: दोन हजार रुपये
वाहतूक व आरोग्य: दोन हजार रुपये
गुंतवणुकीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट
30,000 पगारापैकी 6000 रुपये म्हणजेच दरमहा 20 टक्के रक्कम चांगल्या योजनेत गुंतवावी. यासाठी तुम्ही SIP, FD मध्ये गुंतवणूक करू शकता. उरलेले पैसे तुम्ही इन्शुरन्स, इमर्जन्सी फंड आणि तुमच्या इतर खर्चासाठी वापरू शकता.
गुंतवणुकीसाठी
इमर्जन्सी फंडासाठी 6000 रुपये
विमा: 1000 रुपये
EMI साठी: इतर खर्चांसाठी 3000 रुपये- 4000 रुपये
पैसा कसा वाचवायचा हे आपल्यावर असतं. अनेकदा असं होतं की सगळ्याच गोष्टी या गरजेच्या वाटतात. पण, असं नसतं. तुम्ही सरळ यादी करा की, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे आणि कोणत्या गोष्टी गरजेच्या नाही. यावरुन तुम्हाला अंदाज येईल आणि पुढे प्लॅन देखील चांगला बनवता येईल. अनेकदा लोक वर्षभराची देखील प्लॅनिंग करतात. याने तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही दुसरीकडे तो पैसा वापरू शकाल.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
