AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Moto Tab G70 बद्दल बोलायचे तर, हा एक हाय-एंड टॅबलेट आहे, जो गेमिंग आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरला जाऊ शकतो. युजर्स व्हिडिओ आणि गेमिंगसाठी देखील याचा वापर करू शकतात.

Motorola Moto Tab G70 साठी प्री बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Motorola Moto Tab G70
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 7:00 AM
Share

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) भारतात आपले नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Motorola Moto Tab G70 असे आहे. हा एक टॅबलेट (Tablet) आहे आणि रियलमी पॅड आणि सॅमसंग टॅब्लेटशी स्पर्धा करेल. Moto Tab G70 च्या प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2K डिस्प्ले, क्वाड स्पीकर आणि अनेक चांगले स्पेक्स मिळतील. या टॅबची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यात मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर आणि क्वाड स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी अॅटमॉससह येतात.

Moto Tab G70 बद्दल बोलायचे तर, हा एक हाय-एंड टॅबलेट आहे, जो गेमिंग आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरला जाऊ शकतो. युजर्स व्हिडिओ आणि गेमिंगसाठी देखील याचा वापर करू शकतात.

Motorola Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola च्या या लेटेस्ट टॅबलेटबद्दल बोलायचे झाले तर, यात 11 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह येतो. यात पातळ बेझल्स आहेत, जे टॅब्लेटला आकर्षक लुक देतात. तसेच, त्यात एज टू एज व्ह्यूचा अँगल देण्यात आला आहे. हा टॅबलेट एचडी सर्टिफिकेशनसह येतो, जो Amazon आणि Netflix सारख्या स्ट्रीमिंग अॅप्सना सपोर्ट करतो.

Motorola Moto Tab G70 ची बॅटरी

मोटोरोलाच्या या टॅबलेटमध्ये 7700 mAh ची बॅटरी दिली आहे, जी टॅबलेटला मजबूत बॅटरी बॅकअप देण्यास मदत करेल. याशिवाय, यामध्ये MediaTek Helio G90T ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये युजर्सना 4 जीबी रॅम मिळेल. तसेच यामध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. आवश्यक असल्यास युजर्स यामध्ये 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Motorola Moto Tab G70 चा कॅमेरा

Motorola Moto Tab G70 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो. यात क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जी डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करते.

Moto Tab G70 ची किंमत आणि ऑफर्स

Moto G70 फ्लिपकार्टवर आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 21,990 रुपये आहे. हा टॅब सिंगल कलर आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनी हा टॅब ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर फक्त 24,249 रुपयांमध्ये देत आहे. फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार या टॅब्लेटचा सेल 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होईल.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

(Motorola Moto Tab G70 available fro pre order on Flipkart)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.