AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Netflix | नेटफ्लिक्सकडून मनोरंजनाची स्वस्तात मेजवानी , सबक्रिप्शन प्लॅनमध्ये कपात; ॲमेझॉन प्राईम  30 रुपयांनी महाग

देशातील ओटीटी प्लॅटफॉर्म वरील भाऊगर्दीत टिकून राहण्यासाठी आणि अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने  (Netflix) दमदार हजेरी लावली आहे.

Netflix | नेटफ्लिक्सकडून मनोरंजनाची स्वस्तात मेजवानी , सबक्रिप्शन प्लॅनमध्ये कपात; ॲमेझॉन प्राईम  30 रुपयांनी महाग
Netlix
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 7:51 PM
Share

मुंबई :  देशातील ओटीटी प्लॅटफॉर्म वरील भाऊगर्दीत टिकून राहण्यासाठी आणि अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने  (Netflix) दमदार हजेरी लावली आहे. नेटफ्लिक्सने सबस्क्रिबशन प्लॅन मध्ये कमालीची कपात केली आहे. सुरुवातीच्या 199 रुपयांची किंमतीत 50 रुपयांची कपात करत नेटफ्लिक्सने ती 149 रुपये इतकी केली आहे. हा प्लॅन मोबाईल आणि टॅबसाठी संरक्षित आहे. यामध्ये ग्राहकाला उच्च दर्जाचे व्हिडिओ पहायला मिळतील. त्याचं रिज्युलेशन 480 पी इतकं आहे

तर इकडे ॲमेझॉन प्राईम ने त्यांच्या किंमतीत 20 ते 30 टक्के वाढ केली आहे. प्राईमची  179 रुपयांनी सुरुवात असून नेटफ्लिक्सच्या तुलनेत हा प्लॅन 30 रुपयांनी महाग आहे. 2016 मध्ये नेटफ्लिक्सने भारतात सेवा सुरू केली आहे.

एकाच डिव्हाईसवर सेवा नेटफ्लिक्सने स्वस्तातील प्लॅन आणला असला तरी त्यातील एक गोम तुमच्या नजरेतून नक्कीच सुटणार नाही. हा प्लॅन अगोदरच सांगितल्याप्रमाणे मोबाईल अथवा टॅबला सपोर्ट करतो. टीव्ही-घरातील संगणकाला त्याचं एक्सेस नाही. एकावेळी एकाच डिव्हाईसवर त्याचा उपयोग करून घेता येईल. दुसऱ्या बेसिक प्लॅन हा 199 रुपयांचा असून ओटीटी प्रेमींना 480 पी रिज्युलेशन दर्जाचा व्हिडिओ पाहता येईल. या प्लॅन मध्ये कम्प्युटर आणि टीव्हीला एक्सेस देण्यात आले आहे. असं असले तरी या प्लॅनमध्येही एकाच डिव्हाईसचा वापर करता येणार आहे.  4K(4 हजार रिज्युलेशन)  चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त 649 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला ॲप सह चार डिव्हाईसचा वापर करता येईल. ज्यात टिव्ही, कम्प्युटर यांचा समावेश आहे.

ग्राहकांची चंगळ

एन्ट्री लेवल प्लॅन नंतर मध्यम प्लॅन मध्ये नेटफ्लिक्सने दमदार कामगिरी केली आहे. या मध्यम योजनेची किंमत 649 रुपयांहून 499 रुपये इतकी  कमी झाली आहे. यामध्ये चित्रपट आणि वेबसिरीज एचडी मध्ये बघता येईल. नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा प्लॅन हा 799 रुपयांचा होता. तो आता 649 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये ग्राहकांना अल्ट्रा हाय डेफिनेशन व्हिडिओ पाहता येईल.

अनेक डिव्हाईस, ॲमेझॉन प्राईम ॲमेझॉन प्राईमने 459 रुपयांमध्ये 3 महिन्यांच्या मेंबरशिप प्लॅन आणला आहे. यामध्ये एकाच वेळी अनेक डिव्हाईसवर तुम्हाला मनोरंजनाचा आनंद लुटता येईल. यात पाच प्रोफाईल तयार करता येऊ शकतात, यामध्येच लहान मुलाच्याही एका प्रोफाईलचा समावेश आहे. एका वर्षांकरिता युजर्स ला 1499 रुपयांचा खर्च येणार आहे. वास्तविक या किंमती 14 डिसेंबर पासून लागू करण्यात आले आहेत. अगोदरच मेंबरशिप घेतलेल्या युजर्सना याची झळ बसणार नाही,हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या :

Maharashtra Vidhan Parishad Election Result: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले म्हणजे विजय निश्चित? फडणवीस म्हणतात, राजकारणात केमिस्ट्री चालते!

निवडणुकांचा हंगाम, मतदानकार्ड नाहीय? ऑनलाईन कसं मागवायचं माहितीय का?

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.