पुन्हा एकदा मोफत Netflix पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कन्टेंट?

भारतातील आघाडीचं स्ट्रिमिंग अ‍ॅप नेटफ्लिक्स (Netflix) भारतीय युजर्ससाठी पुन्हा एकदा मोफत सब्सक्रिप्शन देत आहे.

पुन्हा एकदा मोफत Netflix पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कन्टेंट?
नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 4:32 PM

मुंबई : भारतातील आघाडीचं स्ट्रिमिंग अ‍ॅप नेटफ्लिक्स (Netflix) भारतीय युजर्ससाठी मोफत सब्सक्रिप्शन देत आहे. नुकताच नेटफ्लिक्सने भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला होता. Netflix StreamFest अंतर्गत कंपनीने युझर्सना 5 आणि 6 डिसेंबर रोजी मोफत सेवा दिली होती. आता पुन्हा एकदा कंपनी अशीच ऑफर घेऊन येत आहे. कंपनीने देऊ केलेल्या नव्या ऑफरनुसार युजर्स 9 ते 11 डिसेंबरपर्यंत नेटफ्लिक्सवरील कन्टेंट मोफ्त पाहू शकतात. जर तुम्ही यापूर्वीचा स्ट्रीमफेस्ट मिस केला असेल तर तुमच्यासाठी आता अजून एक संधी आहे. (Netflix will be free for three days in india; heres how you can get this Offer)

कंपनी कन्टेंट मोफत पाहण्याची संधी देत असली तरी, या मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन (480p) असलेला कन्टेंटच पाहता येईल. तसेच या स्ट्रीमफेस्टदरम्यान युजर्सना डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्स शोज पाहायचे असतील तर त्यांना त्यांच्या ब्राऊझरमधून www.netflix.com/in/streamfest ही लिंक ओपन करावी लागेल. यावरुन युजर्स लॅपटॉप आणि कम्प्युटवरुन नेटफ्लिक्स पाहू शकतात. तसेच युजर्स अँड्रॉयड, iOS आणि स्मार्ट टीव्हीवरही मोफत नेटफ्लिक्स पाहू शकतात.

नेटफ्लिक्सचे विविध प्लॅन्स

मोबाईल आणि बेसिक प्लॅन

नेटफ्लिक्स सध्या युजर्सना चार वेगवेगळे प्लॅन देत आहे. यापैकी पहिला मोबाईल प्लॅन आहे. 199 रुपये प्रतिमहिना देऊन तुम्ही नेटफ्लिक्स पाहू शकता. यामध्ये तुम्हाला केवळ एकाच स्क्रीनवर शोज पाहता येतील, तसेच कन्टेंट एचडीऐवजी स्टॅन्डर्ड क्वालिटीमध्ये (480p) असेल. कंपनीने दुसरा बेसिक प्लॅन देऊ केला आहे. 499 रुपयांमध्ये हा एक महिन्याचा प्लॅन दिला जातोय. यामध्ये युजर्सना एकच स्क्रीन मिळेल, परंतु मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवरुनही युजर्स नेटफ्लिक्सचा वापर करु शकतात.

स्टँडर्ड प्लॅन

कंपनीने 649 रुपयांचा स्टँडर्ड प्लॅन देऊ केला आहे. यामध्ये युजर्सना अधिक चांगल्या क्वालिटीमध्ये (1080p) व्हिडीओ पाहता येतील. या प्लॅनमध्ये कंपनीने युजर्नसा दोन स्क्रीन्स देऊ केल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी तुम्ही दोन वेगवेगळ्या डिव्हाईसेसवर नेटफ्लिक्स पाहू शकता. तसेच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट अशा कोणत्याही डिव्हाईसवरुन तुम्ही नेटफ्लिक्स अॅक्सेस मिळवू शकता.

प्रिमियम प्लॅन

नेटफ्लिक्सने युजर्सना चौथा आणि सर्वात महागडा 799 रुपये प्रतिमहिना असा प्रिमियम प्लॅन दिला आहे. या प्लॅनमध्ये युजर्स 4K+HDR क्वालिटी पिक्चर्स पाहू शकतात. तसेच या प्लॅनमध्ये कंपनीने चार स्क्रीन्सचा अॅक्सेस दिला आहे, याचाच अर्थ एकाच वेळी तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाईसेसवर नेटफ्लिक्स पाहू शकता. हा एक प्रकारचा फॅमिली पॅकच आहे. चार मित्र मिळून हा प्लॅन घेऊ शकतात.

स्ट्रीमफेस्टअंतर्गत नेटफ्लिक्स शेअर करता येणार नाही

ज्या युझर्सनी नेटफ्लिक्सची मेंबरशिप घेतली आहे, असे युझर्स आपलं अकाऊंट आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. परंतु स्ट्रिमफेस्ट अंतर्गत जे युझर्स मोफत अकाऊंट क्रिएट करतील, ते त्यांचं अकाऊंट कोणाशीही शेअर करु शकणार नाहीत.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये चढाओढ

नेटफ्लिक्स सध्या स्ट्रीमफेस्टचं आयोजन करुन भारतात अमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी 5 आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सना टक्कर देऊ पाहतंय. कंपनीने दिलेली ही ऑफर किती नवे सब्सक्रायबर्स मिळवून देतेय हे येत्या काळात स्पष्ट होईल.

अधिक सब्सक्रायबर्स मिळवण्यासाठी ऑफर्स

जास्तीत जास्त युजर्सपर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर्स मिळवणे हे कंपनीचे सध्या मुख्य टार्गेट आहे. लोकांना अशा प्रकारचे मोफत शोज पाहण्याची संधी देऊन लोक नेटफ्लिक्स इन्स्टॉल करतील, अॅप पाहतील, तिथला कन्टेंट पाहतील आणि त्यानंतर तो कन्टेंट (चित्रपट, सीरिज, डॉक्युमेंटरी आणि इतर) पाहण्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्राईब करतील, असा विश्वास कंपनीला वाटतो. त्यामुळे कंपनीने पुन्हा एकदा युजर्सना मोफत कन्टेंट पाहण्याची संधी दिली आहे.

संबंधित बातम्या

नेटफ्लिक्सच्या मेंबरशिपबाबत तुम्हालाही मेल आलाय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान!

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

(Netflix will be free for three days in india; heres how you can get this Offer)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.