मोफत Netflix पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कन्टेंट

Netflix ने भारतीय युझर्ससाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोफत Netflix पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कन्टेंट

मुंबई : भारतातील आघाडीचं स्ट्रिमिंग अॅप नेटफ्लिक्स (Netflix) भारतीय युजर्ससाठी मोफत सब्सक्रिप्शन देत आहे. नेटफ्लिक्सने भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सना ही मोफत सेवा दिली जाणार आहे. या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कन्टेंट मोफत पाहता येणार आहे. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे अॅपवर साईन इन करावं लागणार आहे. (Netflix will be free for two days in india; heres how you can get this Offer)

विशेष म्हणजे या दोन दिवसांच्या सब्सक्रिप्शनसाठी युजर्नसा त्यांच्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती देण्याचीही गरज भासणार नाही. परंतु या मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युझर्सना एचडी ऐवजी केवळ स्टँडर्ड डेफिनेशन कन्टेंटच पाहता येईल. 5 आणि 6 डिसेंबर रोजी या स्ट्रिमफेस्टचं (Netflix Stream Fest) आयोजन करण्यात आलं आहे. 5 डिसेंबर रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 6 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत हा Stream Fest ऑफर सुरु असेल.

नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलं की, “नेटफ्लिक्सद्वारे भारतातील मनोरंजन प्रेमींसाठी आम्ही ‘स्ट्रीमफेस्ट’ आयोजित करत आहोत. त्याद्वारे भारतीय युजर्स 5 आणि 6 डिसेंबर रोजी भारतात कुठेही नेचफ्लिक्सवर सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट, वेबसीरिज, डॉक्युमेंट्रीज पाहू शकतात. जे नेटफ्लिक्सचे ग्राहक नाहीत, ते त्यांचं नाव, ई-मेल आडी किंवा फोन नंबर आणि पासवर्डसह साइन इन करू शकतात आणि कोणतेही पैसे न मोजता स्ट्रिमिंग सुरू करू शकतात”.

मोफत स्ट्रिमिंगसह नेटफ्लिक्सने इतर फिचर्सही देऊ केले आहेत, ज्यामध्ये प्रोफाईल, पॅरेंटल कंट्रोल, क्रिएट लिस्ट, डाऊनलोड मुव्ही आणि शो या फिचर्सचा समावेश आहे. या स्ट्रिमफेस्टमुळे नेटफ्लिक्सच्या ट्राफिकमध्ये मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. तसेच दोन दिवसांसाठी मोफत सब्सक्रिप्शन घेणारे अनेक ग्राहक पुढे नेटफ्लिक्सचे प्लॅन्स विकत घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ज्या युझर्सनी नेटफ्लिक्सची मेंबरशिप घेतली आहे, असे युझर्स आपलं अकाऊंट आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. परंतु स्ट्रिमफेस्ट अंतर्गत जे युझर्स मोफत अकाऊंट क्रिएट करतील, ते त्यांचं अकाऊंट कोणाशीही शेअर करु शकणार नाहीत.

संबंधित बातम्या

नेटफ्लिक्सच्या मेंबरशिपबाबत तुम्हालाही मेल आलाय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान!

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

(Netflix will be free for two days in india; heres how you can get this Offer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI