AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hotstar आणि Amazon ला टक्कर देण्यासाठी Netflix चा नवा प्लॅन, किंमत फक्त…

नेटफिल्क्सवरील मिर्जापूर, सेक्रेड गेम्स, टीवीएफ ट्रिपलिंग यासारख्या वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे Hotstar आणि Amazon Prime Video टक्कर देण्यासाठी नेटफिल्क्स (Netflix) ने भारतीय युझर्ससाठी नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केला आहे

Hotstar आणि Amazon ला टक्कर देण्यासाठी Netflix चा नवा प्लॅन, किंमत फक्त...
नेटफ्लिक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केले खास फीचर
| Updated on: Jul 24, 2019 | 5:24 PM
Share

मुंबई : Hotstar आणि Amazon Prime Video टक्कर देण्यासाठी नेटफिल्क्स (Netflix) ने भारतीय युझर्ससाठी नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. या नव्या प्लॅनची किंमत फक्त 199 रुपये असणार आहे. हा प्लॅन फक्त 30 दिवस म्हणजे एका महिन्यासाठी आहे. तसेच हा प्लॅन खास मोबाईल युझर्ससाठी बनवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ 199 रुपयांच्या रिचार्जवर मोबाईल आणि टॅबलेटवर तुम्हाला Netflix पाहता येणार आहे.

दरम्यान Netflix ने इतर प्लॅनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे भारतातील Netflix युझर्सना रिचार्जचे चार पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात Mobile, Basic, Standard आणि Premium अशा प्लॅनचा समावेश आहे. यात 499 रुपयांचा बेसिक प्लॅन, 649 रुपयांचा स्टॅंडर्ड प्लॅन आणि 799 रुपयांचा प्रीमियम प्लॅनचा समावेश आहे.

799 रुपयांचा प्रीमियम प्लॅन

दरम्यान 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये Netflix युझर्सला टॉप फीचर्स मिळतात. तसेच हा रिचार्ज केल्यानंतर Ultra HD सपोर्टही मिळतो. विशेष म्हणजे हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप आणि टीव्ही अशा कोणत्याही माध्यमांवर Netflix पाहता येते. हा रिचार्ज केल्यानंतर एकावेळेला चार जण वापरु शकतात.

199 रुपयांचा प्लॅन

तर 199 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला Netflix केवळ मोबाईल किंवा टॅबलेटवर पाहाता येणार आहे. हा रिचार्जची वैधता 30 दिवस आहे. पण याची क्वॉलिटी SD म्हणजे 480 Pixel इतकीच असणार आहे. तसेच हा  रिचार्ज एकावेळेस एका व्यक्तीलाच वापरता येतो.

दरम्यान Hotstar Premium साठी तुम्हाला दर महिना 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. तर Amazon Prime Video हे अप 129 रुपयात तुम्हाला महिनाभर स्ट्रीमिंगची सुविधा देते. तर वार्षिक प्लॅनची किंमत विविध आहे.

Netflix चे भारतात सर्वाधिक मोबाईल युझर्स आहेत. यामुळे Netflix च्या अपवर स्मार्ट डाऊनलोड, मोबाईल प्रिव्ह्यू, सोशल मीडिया शेअरिंग यांसारख्या विविध फीचर्सचे अपडेट दिले आहे, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे.

नेटफिल्क्सच्या चाहत्यांना सेक्रेड गेम्स 2 ची प्रतीक्षा

दरम्यान येत्या ऑगस्ट महिन्यात सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games 2) ही वेबसीरिज लाँच होणार आहे. सेक्रेड गेम्स 1 याआधी भारतात सार्वाधिक हीट झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हा Netflix  ने मोबाईल युझर्ससाठी हा नवा प्लॅन लाँच केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेटफिल्क्स हे आजच्या जनरेशनसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. टीव्हीवर सीरियल पाहणारे अनेक लोक आता वेबसीरीज पाहत आहेत. नेटफिल्क्सवरील मिर्जापूर, सेक्रेड गेम्स, टीवीएफ ट्रिपलिंग यासारख्या वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.