Smart Watch : पुढील आठवड्यात लाँच होणार न्यू ब्रँड Dizo Watch D स्मार्टवॉच, कंपनीचे फिचर पाहिलेत का?

एका रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात न्यू ब्रँड Dizo Watch D स्मार्टवॉच लाँच करण्यात येणार आहे. अद्याप अधिकृतपणे या घड्याळाच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, परंतु कंपनीचा मागील ट्रॅक पाहता असे म्हणता येईल, की डिझो वॉच डी एक बजेट स्मार्टवॉच असेल, अशी आशा करुया.

Smart Watch : पुढील आठवड्यात लाँच होणार न्यू ब्रँड Dizo Watch D स्मार्टवॉच, कंपनीचे फिचर पाहिलेत का?
पुढील आठवड्यात लाँच होणार न्यू ब्रँड Dizo Watch D स्मार्टवॉच, कंपनीचे टीझर पाहिलेत का?
दादासाहेब कारंडे

|

Jun 02, 2022 | 12:06 AM

रिअलमीच्या (Realme) सब-ब्रँड डिझोचे नवीन घड्याळ डिझो वॉच डी (Dizo Watch D) 7 जून रोजी भारतात लाँच होणार आहे. डिझो वॉच डीबद्दल असे सांगितले जात आहे, की हे त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठे डिसप्ले असलेले स्मार्टवॉच असेल. रिपोर्टनुसार, डिझो वॉच डीची स्क्रीन स्टँडर्ड साइजच्या (Standard size) तुलनेत 15 टक्के अधिकने मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डिझो वॉच डी कर्व्ड ग्लास डिझाइनसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आरोग्यासोबतच स्पोर्ट्स मोडही घड्याळात उपलब्ध असेल, त्यामुळे आता ही स्मार्टवॉच लाँच झाल्यावर कंपनी नेमक यासोबत अजून काय फीचर्स देणार याची उत्सूकता ग्राहकांना लागली आहे. डिझो वॉच डी भारतात 7 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच केली जाणार असल्याचे कंपनीच्या वतीनं सांगण्यात आले आहे. ही स्मार्टवॉच फ्लिपकार्ट व्यतिरिक्त किरकोळ स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे. घड्याळाच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. परंतु कंपनीचा मागील ट्रॅक पाहता डिझो वॉच डी एक बजेट स्मार्टवॉच असेल.

‘डिझो वॉच डी’चे स्पेसिफिकेशन्स

डिझो वॉच डीमध्ये 550 निट्स ब्राइटनेससह 1.8 इंचाचा कलर डिसप्ले देण्यात आलेला आहे. डिसप्ले टेम्पर्ड ग्लासद्वारे कव्हर करुन त्याला अधिक सेफ्टी देण्यात आली आहे. घड्याळ वॉटर रेसिस्टेंट असेल. 50 मीटर पाण्यात गेल्यावरही घड्याळीचे कुठलेही नुकसान होणार नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. डिझो वॉच डी सॉफ्ट सिलिकॉन स्ट्रॅपसह प्रीमियम मेटल फ्रेमसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.

10 दिवसांचा बॅकअप

लिक झालेल्या एका माहितीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने आयताकृती डी कर्व्ड ग्लास डिसप्लेसह डिझो वॉच एस सादर केली आहे. याच्या बॅटरीबाबत 10 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या नवीन स्मार्टवॉचमध्येही असेच काहीसे फीचर बघायला मिळेल, अशी आशा ग्राहकांना लागली आहे. दरम्यान, डिझो वॉच 2 एस 110 स्पोर्ट्स मोडसह उपलब्ध होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें