एक रुपयासुद्धा टोल टॅक्स द्यावा लागणार नाही, Google Maps मध्ये ऑन करा ही सेटिंग
गुगल मॅपच्या मदतीने टोल रोड टाळून तुम्हाला पैसे वाचवता येणार आहे. गुगल मॅपच्या या सेटींगमुळे कोणत्या रस्त्यावर किती गर्दी आहे, त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे. गूगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करुन हा बदला करता येणार आहे.

प्रवास करताना एक्स्प्रेस वे किंवा महामार्गांवरुन जाताना अनेक ठिकाणी टोल रोडवरुन जावे लागते. टोल रोडवर जाताना नेहमी टोल टॅक्स द्यावा लागतो. परंतु टोल टॅक्स न भरता प्रवास करता आला तर? हे शक्य होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला गुगल मॅपमध्ये एक बदल करावा लागेल. गुगल मॅपच्या मदतीने टोल रोड टाळून तुम्हाला पैसे वाचवता येणार आहे.
गुगल मॅपच्या या सेटींगमुळे कोणत्या रस्त्यावर किती गर्दी आहे, त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे. गूगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करुन हा बदला करता येणार आहे.
असा करा बदल
Google Maps च्या सुविधांचे अवलंबन करणे खूप सोपे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- गुगल मॅप ओपन करा.
- ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे, ते ठिकाण टाका
- रुट स्क्रीनवर तीन डॉट असणारा मेन्यू येईल. त्यावर ‘Route Options’ या पर्यायावर जा.
- ‘Avoid tolls’ हा पर्याय मिळेल. तो पर्याय निवडा.
- आता गूगल मॅप ज्या ठिकाणी टोल लागणार नाही, असे पर्याय तुम्हाला दाखवणार आहे.
कमी गर्दीचे रस्ते दाखवणार
गूगल मॅप फीचरमुळे तुम्हाला टोल वाचवता येईल. तसेच टोल रोडवर अनेक वेळा वेगाने गाड्या धावत असतात. काही वेळा वाहतूक ठप्प होत असते. परंतु टोल नसणारा मार्ग लहान आणि सोपा असू शकतो. तसेच गूगल मॅप तुम्हाला असे रस्तेही दाखवणार, ज्या ठिकाणी गर्दी कमी आहे. वाहतूक जाम नाही.
कधी कधी टोल वाचवण्यासाठी थोडा लांबचा मार्गही निवडावा लागतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार मार्ग निवडणे गरजेचे आहे. तसेच ज्या शहरांसाठी टोलच मुख्य मार्ग आहे, त्या ठिकाणी पर्याय कमी असतात किंवा टोल रोडशिवाय दुसरा पर्याय नसेल. या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला गूगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणे गरजेचे आहे.
