AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात सर्वात जास्त लोक हे सोपे पासवर्ड वापरतात, तुम्ही तर वापरत नाही ना हे पासवर्ड, लगेच बदला

इंटरनेट युजर नेहमी पासवर्ड वापरताना अतिशय सोपे पासवर्ड तयार करतात. देशातील कॉमन पासवर्डची एक यादीच NordPass ने जाहीर केली आहे. लोकांना पासवर्ड लक्षात रहात नसल्याने असे सोपे पासवर्ड वापरले जातात. परंतू हॅकरकडून असे पासवर्ड सहज क्रॅक होण्याचा धोका प्रचंड असतो. त्यामुळे पासवर्ड तयार करताना नेहमी दिलेल्या सूचनांचे पालन करुन पासवर्ड तयार केले पाहीजेत.

देशात सर्वात जास्त लोक हे सोपे पासवर्ड वापरतात, तुम्ही तर वापरत नाही ना हे पासवर्ड, लगेच बदला
common-worst-password-securityImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 16, 2023 | 3:54 PM
Share

नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : संगणक, मोबाईल किंवा कोणतेही एप वापरायचं असेल तर स्ट्रॉंग पासवर्ड आवश्यक आहे. परंतू अनेकदा युजर पासवर्ड विसरत असल्याने ते सोपे पासवर्ड तयार करुन वापरतात. यामुळे अशी असुरक्षित पासवर्डमुळे सायबर क्राईम करणाऱ्यांचे फावते. NordPass या संस्थेने भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कॉमन पासवर्डची यादीच जाहीर केली आहे. या यादीतील पासवर्ड पाहून आपल्याला कळते की भारतात किती सोपे पासवर्ड इंटरनेट युजर वापरत आहेत. अशा प्रकारे सोपे पासवर्ड वापरणे म्हणजे फसवणूक करणाऱ्यांना आयते आंदण देण्यासारखे आहे.

NordPass या सर्वेतील काही बाबी शेअर केल्या आहेत. NordPass च्या मते इंटरनेट युजर आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अत्यंत कमजोर आणि सोप्या पासवर्डचा वापर करीत असतात. जागांची नावे देखील पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापरली जातात. त्यामुळे बहुतांश इंटरनेट युजर आपल्या पासवर्ड मध्ये India या शब्दाचा सर्वाधिक वापर करतात. तर सर्वात कॉमन पासवर्ड म्हणून india@124 असा आहे.

हे आहेत भारतातील कॉमन पासवर्ड –

administrator

Password@123

Password

UNKNOWN

admin@123

Pass@1234

1234567890

Abcd@1234

Welcome@123

Abcd@123

admin123

Pass@123

123456789

Admin@123

India@123

123456

admin

12345678

12345

password

सहज क्रॅक होण्याचा धोका –

अलिकडच्या एका अहवालानूसार ब्राऊझर मध्ये सेव्ह केले गेलेले पासवर्ड वास्तविक इतके सुरक्षित नाहीत, जेवढे आपल्याला ते सुरक्षित वाटतात. NordPass संस्थेच्या अहवालानूसार त्यांच्याकडील डेटाबेस मध्ये सामील जवळपास 70 टक्के पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक केले जाऊ शकतात. जर एखाद्या हॅकरने जर तुमचा ब्राऊझर हॅक केला तर तो तुमच्या सर्व पासवर्डना सहज पाहू शकतो. त्यामुळे युजरच्या खात्यांना प्रचंड नुकसान होऊ शकते.

या करीता हे काम करा –

जर तुम्ही तुमच्या पासवर्डना सुरक्षित ठेवू इच्छीत असाल तर त्यांना सुरक्षित स्थानी सेव्ह करायचे असेल तर त्यांना अधिक सुरक्षित स्थानी सेव्ह करण्याचा विचार करा. पासवर्ड मॅनेजर एक चांगला पर्याय आहे. एक पासवर्ड मॅनेजर तुमच्या सर्व पासवर्डना एका सुरक्षित स्थानी सेव्ह करतो. तसेच त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत एन्क्रिप्शनचा वापर करतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.