AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायरलेस चार्जिंग सपोर्टसह नथिंग फोन 1 लवकरच होणार लाँच…काय आहेत स्पेसिफिकेशन्स

नथिंगचा नवीन स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची चर्चा आधीच मोबाईल मार्केटमध्ये होती. त्यामुळे ग्राहकही या फोनची वाट पाहत आहेत. परंतु आता ही प्रतीक्षा संपणार असून कंपनीने स्मार्टफोनची अधिकृत लाँचिंग डेट जाहीर केली आहे. नथिंग फोन 1 येत्या 12 जुलै रोजी बाजारात दाखल केला जाईल.

वायरलेस चार्जिंग सपोर्टसह नथिंग फोन 1 लवकरच होणार लाँच...काय आहेत स्पेसिफिकेशन्स
| Updated on: Jun 09, 2022 | 6:02 PM
Share

मुंबईः वन प्लसचे सह-संस्थापक कार्ल पाई यांची कंपनी नथिंग लवकरच आपला नवीन स्मार्टफोन (Smartphone) ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या नवीन स्मार्टफोन नथिंग फोन 1 (Nothing Phone 1) या नावाने लाँच करण्यात येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. नथिंग नवीन स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची चर्चा आधीच मोबाईल मार्केटमध्ये होती. त्यामुळे ग्राहकही या फोनची वाट पाहत आहेत. परंतु आता ही प्रतीक्षा संपणार असून कंपनीने स्मार्टफोनची अधिकृत लाँचिंग डेट जाहीर केली आहे. नथिंग फोन 1 येत्या 12 जुलै रोजी बाजारात दाखल केला जाईल. यासह, कंपनीने त्याचे फीचर्सदेखील (Features) उघड केले आहे. फोनचा एक टीझर समोर आला असून त्यातून फोनच्या डिझाईनचा अंदाज लावला जाऊ शकतो.

दरम्यान, फोनची खास गोष्ट म्हणजे हा वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. ई-कॉमर्स वेबसाइटने नथिंग फोन 1 लाँच करण्यासाठी एक डेडीकेटेड लॅंडिंग पेजचीही निर्मिती केली आहे.

कधी होणार लाँच

नथिंग फोन 1 हा 12 जुलै रोजी ‘रिटर्न टू इन्स्टिंक्ट’ या व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे लाँच केला जाईल. नथिंग लाँचिंग इव्हेंट IST रात्री 8.30 वाजता सुरू होईल आणि अधिकृत YouTube चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यासोबतच युजर्स नथिंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन इव्हेंटची माहितीबाबत अपडेट मिळविण्यासाठी त्यावर साइन अप करू शकतात. या लाँचिंगच्या कार्यक्रमासाठी कंपनीकडून मीडियालाही आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या नवीन स्मार्टफोनच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी कंपनीने आपल्या पहिल्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल तपशील शेअर केला आहे. नथिंग फोन 1 मध्ये नथिंग इअर 1 ट्रू वायरलेस इअरबड्स प्रमाणेच पारदर्शक डिझाइन असेल. हा स्मार्टफोन Qualcomm च्या स्नॅपड्रॅगन SoC ने परिपूर्ण असेल. हे ॲंड्रोइडवर आधारित Nothing OS वर चालणार आहे. नथिंग फोन 1 चे स्पेसिफिकेशन याआधीही अनेकदा लीक झाले आहेत. यात 1,080×2,400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55-इंचाचा OLED डिसप्ले मिळण्याची माहिती आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.