AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 10 सेकंदांत पूर्ण होईल ऑनलाइन पेमेंट

NPCI ने UPI व्यवहारांसाठीचा रिस्पॉन्स टाइम 30 सेकंदांवरून फक्त 10 सेकंदांवर आणला आहे. त्यामुळे PhonePe, Google Pay आणि Paytm यांसारख्या अ‍ॅप्सवर पेमेंट स्टेटस लवकर मिळणार आहे. या बदलामुळे नक्की काय आणि कसा फायदा होईल, ते जाणून घ्या.

UPI वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 10 सेकंदांत पूर्ण होईल ऑनलाइन पेमेंट
UPIImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 6:09 PM
Share

युपीआय (UPI) वापरणाऱ्या कोट्यवधी यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय ट्रान्झॅक्शन संदर्भातील काही तांत्रिक बदल करत ट्रान्झॅक्शन व रिव्हर्सल स्टेटससाठीचा रिस्पॉन्स टाइम 30 सेकंदांवरून थेट 10 सेकंदांवर आणला आहे. यामुळे PhonePe, Google Pay, Paytm यांसारखे डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांना पेमेंट कन्फर्मेशनसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

युपीआयमध्ये ट्रान्झॅक्शन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी NPCIने जून 2025 पासून नवे अपडेट लागू केले आहे. याअंतर्गत युपीआय अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) मधील ‘पेमेंट स्टेटस’, ‘रिव्हर्सल स्टेटस’ आणि ‘वॅलिडेट अ‍ॅड्रेस’ यांचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी हे वेळापत्रक 30 ते 15 सेकंद होते, जे आता फक्त 10 सेकंदांमध्ये प्रोसेस होईल.

कोणाला आणि कसा होईल याचा फायदा?

या बदलामुळे रिमिटर बँक, बेनिफिशियरी बँक, UPI सर्व्हिस प्रोवायडर्स (जसे की PhonePe, Google Pay, Paytm) आणि त्यांचे यूजर्स – सर्वांनाच याचा थेट फायदा होणार आहे. याअंतर्गत आता फेल ट्रान्झॅक्शन, स्टेटस अपडेट किंवा पेमेंटच्या कन्फर्मेशनसाठीचा वेळ खूपच कमी होणार आहे.

पूर्वी यूजर्सला पेमेंट झाले की नाही हे समजण्यासाठी 30 सेकंदपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे, पण आता फक्त 10 सेकंदांतच ट्रान्झॅक्शनची स्थिती समजू शकणार आहे. यामुळे ट्रान्झॅक्शनचा अनुभव अधिक वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह होणार आहे.

NPCI म्हणजे काय ?

NPCI म्हणजे National Payments Corporation of India (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली संस्था आहे, जी देशातील डिजिटल पेमेंट प्रणालींचे संचालन आणि विकास करते. NPCI चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतात सुरक्षित, सुलभ, वेगवान आणि सर्वांसाठी उपलब्ध असलेली पेमेंट पद्धती उपलब्ध करून देणे. याच संस्थेने UPI (Unified Payments Interface), IMPS (Immediate Payment Service), RuPay कार्ड, AePS (Aadhaar Enabled Payment System) अशा अनेक महत्त्वाच्या सुविधा सुरू केल्या आहेत. NPCI मुळे देशात डिजिटल व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि जलद झाले आहेत.

NPCI ने पुढील धोरण जाहीर केलं

NPCI ने आपल्या निवेदनात सांगितले की, हे बदल युपीआय यंत्रणेत अधिक सुधारणा घडवण्यासाठी करण्यात आले आहेत. ऑगस्ट 2025 पासून सर्व API रिक्वेस्टचे मॉनिटरिंग आणि मॉडरेशन युपीआय सर्व्हिस प्रोव्हायडर्स व बँकांची जबाबदारी असेल.

त्याचप्रमाणे बँक बॅलन्स इन्क्वायरी, अकाउंट लिस्टिंग, ऑटो पेमेंट मँडेट इत्यादी सेवा देखील नवीन प्रणालीच्या अंतर्गत सुधारित करण्यात येणार आहेत.

NPCIने युपीआय प्लॅटफॉर्म अधिक जलद आणि वापरकर्ता-केंद्रित बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, भविष्यात आणखी काही प्रगत सुविधा यामध्ये पाहायला मिळतील, असे संकेत दिले आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.