भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर

अक्षय चोरगे

Updated on: Mar 31, 2021 | 12:13 PM

वनप्लसचा (OnePlus) लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर
OnePlus

मुंबई : वनप्लसचा (OnePlus) लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा फोन चांगल्या ऑफरसह सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन OnePlus च्या वेबसाईटवरुनदेखील खरेदी करता येईल. (OnePlus 9 Pro sale started in India, know how to buy these smartphones)

एसबीआय क्रेडिट कार्डवर तसेच ईएमआय ऑप्शन्ससह खरेदीदारांना 4,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. वनप्लस 9 प्रो स्मार्टफोनचं 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 64,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 69,999 रुपये या किंमतीसह सादर करण्यात आलं आहे. हा फोन मॉर्निंग मिस्ट, पाइन ग्रीन आणि स्टेलर ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना जबरदस्त कॅमेरा एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने Hasselblad सोबत हात हातमिळवणी करत शानदार कॅमेरा डिझाईन केला आहे.

कसा आहे OnePlus 9 Pro?

OnePlus 9 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. 256 जीबी पर्यंतची इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. यामध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी Warp चार्ज 65T सह येते. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अवघ्या 29 मिनिटात या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

OnePlus 9 चे फीचर्स

हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

इतर बातम्या

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(OnePlus 9 Pro sale started in India, know how to buy these smartphones)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI