घरबसल्या स्टेट बँकेत खाते उघडा; जाणून घ्या नेमकी कशी आहे पद्धत

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात स्टेट बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला आहे. त्याच अनुषंगाने ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. (Open an account at State Bank at home; Find out exactly how the method is)

घरबसल्या स्टेट बँकेत खाते उघडा; जाणून घ्या नेमकी कशी आहे पद्धत
एसबीआयच्या पेन्शन सेवेमुळे त्रस्त आहात? मग या नंबरवर करा मॅसेज, काही मिनिटांत तक्रार होईल दूर

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) आता घरबसल्या बचत खाते उघडता येणार आहे. स्टेट बँकेने आपल्या योनो अपमध्ये ग्राहकांना बचत खाते सहजपणे उघडता यावे, याचा दृष्टीकोनातून नवीन फीचर सुरु केले आहे. या फीचरमुळे ग्राहकांच्या खात्याची व्हिडिओपासून केवायसी केली जाणार आहे. (Open an account at State Bank at home; Find out exactly how the method is)

केवायसीच्या माध्यमातून डिटेल होणार व्हेरीफाय

स्टेट बँकेच्या ग्राहकांना खाते उघडण्यासाठी आता शाखेत जाण्याची गरज नाही. व्हिडीओ केवायसीमध्ये संपूर्ण तपशीलनुसार पॅन कार्ड, आधार कार्ड यांची सतत्या अर्थात व्हेरीफिकेशन केले जाईल. ही अत्यंत सोपी पद्धत असेल. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रणाली पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलेन्सीज आणि चेहरा ओळख तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही कॉन्टॅक्टलेस आणि पेपरलेस प्रक्रिया आहे.

नवीन बचत खाते कसे उघडायचे?

ज्या ग्राहकांना स्टेट बँकेत बचत खाते उघडायचे असेल, त्यांना आपल्या मोबाईलमध्ये योनो अँप डाउनलोड करावे लागेल. त्यात ‘न्यू टू एसबीआय’ वर क्लिक करून नंतर ‘इन्स्टा प्लस सेविंग्स अकाउंटिंग’ची निवड करावी लागेल. पुढे आधार कार्डचा तपशील आणि ओटीपी टाकून व्हिडिओ केवायसी पूर्ण करता येईल. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉल करणे आवश्यक आहे. व्हिडीओ केवायसी यशस्वी झाल्यावर बँकेत ऑटोमॅटिक बचत खाते ऍक्टिव्ह होणार आहे. म्हणजेच यासाठी तुमची बँकेत जाण्याची फेरी वाचणार आहे.

कोरोना महामारीत ग्राहक सुरक्षेवर भर

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात स्टेट बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला आहे. त्याच अनुषंगाने ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महामारीच्या काळात अशा प्रकारची सुविधा गरजेची आहे. ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देताना खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खरा यांनी दिली. आमचे हे पाऊल ग्राहकांच्या सुरक्षेबरोबर आर्थिक सुरक्षा व खर्च कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे, डेव्हलपमेंट डिजिटल इंडियाच्या पूरक गोष्टींमधील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे, असे खरा यांनी नमूद केले आहे. स्टेट बँकेने ‘डिजिटल इंडिया’चा मार्ग धरत नोव्हेंबर योनो अप लाँच केले होते. त्याच आधारे ग्राहकांना विविध सुविधा देऊ केल्या जात आहेत. सध्याच्या घडीला जवळपास ८ कोटी लोकांनी हे अप डाऊनलोड केले आहे, तर ३ कोटी ७० लाखांहून नोंदणीकृत ग्राहक आहेत. स्टेट बँकेने योनो अपसाठी 100 ई-कॉमर्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे. (Open an account at State Bank at home; Find out exactly how the method is)

इतर बातम्या 

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? कशात गुंतवणूक कराल?; कशात मिळेल अधिक रिटर्न?, जाणून घ्या पटापट!

गृहिणींनो, तुमच्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियम बदलणार; वाचा काय होणार परिणाम?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI