AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत

ओप्पो लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन सीरीज लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
Oppo New Phone
| Updated on: Aug 18, 2025 | 5:16 PM
Share

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन सीरीज लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ओप्पोने काही महिन्यांपूर्वी भारतात K13 टर्बो सीरीज लाँच केली होती, त्यानंतर आता कंपनी F31 सीरीजही भारतात लाँच करणार आहे. यात सीरीजमध्ये ओप्पो F31 आणि ओप्पो F31 प्रो हे दोन फोन लाँच केले जाणार आहेत. या दोन्ही फोनमध्ये खास फीचर्स असणार आहे. तसेच या फोनमध्ये 7,000mAh शक्तिशाली देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फोनला आर्मर बॉडी दिली जाणार आहे. यामुळे खाली पडल्यानंतर फोनचे नुकसान होणार नाही.

भारतात कधी लाँच होणार?

भारतीय टिपस्टर पारस गुग्लानी यांनी ओप्पो F31 सीरीजच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. F31 ही सीरीज पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये भारतात लाँच केली जाणार आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या ओप्पो F29 सीरीजच्या तुलनेत या सीरीचमधील फोनचे कॅमेरे आणि बॅटरी अपग्रेड केली जाणार आहे. त्याचबरोबप यात एक नवीन प्रोसेसर दिला जाण्याचीही शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अहवालानुसार, या सीरीजच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. तर प्रो मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. या सीरीजमधील दोन्ही मॉडेल्समध्ये 7000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी दिली जाणार आहे. मागील मालिकेतील प्रो मॉडेलमध्ये 6000 एमएएच बॅटरी होती.

फीचर्स

ओप्पो F31 5 जी सीरीजमध्ये 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. तो 120 हर्ट्झला सपोर्ट करेल. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज दिले जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 50 आणि 32 एमपी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. हा फोन ओएस अँड्रॉइड 15 वर चालेल. याच्या किमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ओप्पो एफ31 सीरीजमध्ये कंपनी आर्मर बॉडी वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेतील दोन्ही मॉडेल्समध्ये डायमंड कट कॉर्नर असतील, ज्यामुळे फोन पडल्यावर तुटण्यापासून वाचणार आहे. तसेच या फोनमधील कॅमेरा फीचर्स देखील अपग्रेड केले जाण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी लाँच झालेल्या Oppo F29 सीरीजमधील स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला होता. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करत होता. हा फोन 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. यात 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.