AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनपेचा नवा फिचर! बँक खात्याशिवायही UPI पेमेंट शक्य, जाणून घ्या कसं कराल व्यवहार!

भारतामध्ये ३५० दशलक्ष UPI वापरकर्त्यांचा मोठा वर्ग असताना, अजूनही अनेक वृद्ध आणि ग्रामीण लोक डिजिटल पेमेंटच्या भीतीमुळे रोख रकमेवर अवलंबून आहेत. UPI सर्कलमुळे हे लोक डिजिटल अर्थव्यवस्थेत सामील होऊ शकतात, ज्यामुळे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इकॉनॉमी’ला एक नवा वळण मिळेल.

फोनपेचा नवा फिचर! बँक खात्याशिवायही UPI पेमेंट शक्य, जाणून घ्या कसं कराल व्यवहार!
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 2:23 PM
Share

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! फोनपे अ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणलं आहे, ज्यामुळे आता बँक खात्याशिवायही UPI पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डिझाईन केलेलं हे फीचर ‘UPI सर्कल’ नावाने ओळखलं जातं आणि यामुळे अगदी ज्यांच्याकडे स्वतःचं बँक अकाउंट नाही अशांनाही डिजिटल व्यवहाराचा लाभ घेता येणार आहे.

UPI सर्कल म्हणजे नेमकं काय?

‘UPI सर्कल’ हे फीचर अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, जे स्वतःचं बँक खातं नसतानाही UPI द्वारे व्यवहार करू इच्छितात. उदाहरणार्थ, घरातील वृद्ध व्यक्ती, कॉलेजमध्ये शिकणारी मुलं किंवा घरकाम करणारे कामगार — यांच्यासाठी हा पर्याय अगदी सोपा आणि सुरक्षित आहे.

हे फीचर कसं काम करतं?

प्रथम, फोनपे अ‍ॅपमध्ये ‘UPI सर्कल’ हा पर्याय निवडून प्राइमरी युजर आपला सर्कल तयार करतो. त्यानंतर ज्याचं बँक अकाउंट नाही, अशा सेकंडरी युजरला सर्कलमध्ये जोडतो.

प्राइमरी युजर सेकंडरी युजरसाठी दोन प्रकारच्या परवानग्या सेट करू शकतो:

या पद्धतीत सेकंडरी युजर दर महिन्याला ठराविक मर्यादेत जसे की ₹15,000 पर्यंत स्वयंपणे पेमेंट करू शकतो. प्रत्येक व्यवहार ₹5,000 पेक्षा जास्त नसावा, अशी मर्यादा असते.

या प्रकारात सेकंडरी युजर पेमेंट करण्यासाठी प्राइमरी युजरकडे विनंती पाठवतो. प्राइमरी युजर ती मंजूर करून UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण करतो.

प्राइमरी युजरकडे प्रत्येक व्यवहाराचं नियंत्रण असतं. गरज भासल्यास तो सेकंडरी युजरच्या परवानग्या कधीही कमी-जास्त करू शकतो किंवा सर्कलमधून त्याला रद्दही करू शकतो.

UPI सर्कलचे फायदे काय?

1. बँक खात्याशिवाय व्यवहार शक्य2. खर्चावर पूर्ण नियंत्रण 3. सेकंडरी युजरला रोख रक्कम न ठेवता डिजिटल व्यवहार करण्याची मुभा 4. सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारांची सुविधा

कोणाला सर्वाधिक फायदा?

हा फीचर विशेष ग्रामीण भागातील लोक, विद्यार्थी, घरातील वृद्ध व्यक्ती आणि दररोज रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Follow Us
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...
आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX...
सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; फडणवीसांचा नाव
Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात
मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... Video तुफान
Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... व्हिडीओ तुफान व्हयरल
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट...
अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप
Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा