Poco M3 Pro 5G बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत 15000 रुपये?

स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco उद्या म्हणजेच 8 जून रोजी Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन Redmi Note 10 5G चं री-ब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

Poco M3 Pro 5G बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत 15000 रुपये?
Poco M3 Pro 5G
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:33 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco उद्या म्हणजेच 8 जून रोजी Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला होता आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल अशी अपेक्षा होती. तथापि, COVID-19 च्या परिस्थितीमुळे स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मे महिन्यातील त्यांचे सर्व लॉन्च इव्हेंट रद्द केले. (Poco M3 Pro 5G to launch in India on 8th June, check price and feature)

भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. असे म्हटले जात आहे की, हा फोन Redmi Note 10 5G चं री-ब्रँडेड व्हर्जन असू शकतो. Poco M3 Pro 5G हा कंपनीचा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे. फोनच्या भारतीय व्हेरिएंटमध्ये फोनच्या ग्लोबल व्हेरियंटप्रमाणेच डिझाइन आणि फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. Poco M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचांचा 90 हर्ट्ज डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC प्रोसेसर आणि 000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.

Poco M3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Poco M3 Pro 5G मध्ये 6.5-इंचांचा FHD+ LCD DotDisplay 1100 निट्स ब्राइटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये डायनॅमिक स्विच फीचर असेल जे स्क्रीनवर काय चालू आहे यावर अवलंबून वेगवेगळ्या रीफ्रेश रेट्सवर स्विच करण्यास अनुमती देईल. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 SoC आणि Mali-G57 MC2 GPU सह 6 जीबी रॅम आणि 128 जीबी UFS 2.2 इंटर्नल स्टोरेजसह सपोर्टेड असेल. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनची स्टोरेज स्पेस वाढवता येईल.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Poco M3 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी

Poco M3 Pro 5G Android 11 वर आधारित MIUI 12 कस्टमवर चालतो. हा फोन 18W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh क्षमतेच्या बॅटरीसह लाँच केला जाईल. यात एक साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळेल.

Poco M3 Pro 5G ची किंमत

Poco M3 Pro 5G हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असेल. या फोनची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनची किंमत 180 यूरो (जवळपास 16,100 रुपये) इतकी आहे.

इतर बातम्या

Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार

64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी

Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

(Poco M3 Pro 5G to launch in India on 8th June, check price and feature)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.