POCO M4 Pro 5G आज लाँच होणार, जाणून घ्या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये काय असेल खास

हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करताना कंपनीने Power Up Your Fan अशी टॅगलाईन दिली आहे.

POCO M4 Pro 5G आज लाँच होणार, जाणून घ्या नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये काय असेल खास
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : POCO कंपनी आज (9 नोव्हेंबर) रोजी त्यांचा नवा 5 जी स्मार्टफोन POCO M4 Pro 5G लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. तसेच, हा फोन अनेक लेटेस्ट फीचर्ससह सादर केला जाईल. आतापर्यंत, कंपनीकडून या फोनच्या स्पेसिफिकेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, परंतु नवीन लीक्सनुसार, या फोनमध्ये 6 एनएम चिपसेट आणि 33W फास्ट चार्जर मिळेल. हा स्मार्टफोन POCO M3 Pro 5G चा अपग्रेड व्हेरिएंट असेल. (POCO M4 Pro 5G launching today with 33W fast charger)

हा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G चं अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जो या वर्षी मे मध्ये लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करताना कंपनीने Power Up Your Fan अशी टॅगलाईन दिली आहे. आतापर्यंत या फोनबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन अलीकडेच Geekbench वर लिस्ट केलेला दिसला, ज्याचा मॉडेल क्रमांक 21091116AC आहे आणि C चा अर्थ चायनिज व्हेरिएंट असा आहे. या लिस्ट वरून हे समोर आले आहे की या डिवाइसमध्ये MediaTek Dimension 810 chipset चा वापर केला जाऊ शकतो, तर काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हा फोन MediaTek Dimension 700 प्रोसेसर सह लॉन्च केला जाईल.

पोकोच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो. याच्या सॉफ्टवेअर डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यासोबतच कंपनीचा कस्टम MIUI देखील यामध्ये उपलब्ध असेल. Poco चा हा फोन 5G NR कनेक्टिव्हिटीसह येईल. तसेच या फोनमध्ये NFC सपोर्ट, GNSS आणि FM रेडिओ सपोर्ट उपलब्ध असेल.

शानदार कॅमेरा

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरेल. तसेच, बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

पॉवरफुल बॅटरी

चार्जिंग क्षमता वाढवण्यासाठी कंपनी यामध्ये 33W फास्ट चार्जर देऊ शकते. जुन्या लीक्स रिपोर्टनुसार, हा फोन 5000mAh बॅटरीसह सादर होऊ शकतो, तसेच यात 8 GB पर्यंत रॅम आणि बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. हा फोन रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा फोन Redmi Note 11 चं वेगळं व्हर्जन असेल.

इतर बातम्या

सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

(POCO M4 Pro 5G launching today with 33W fast charger)

Published On - 11:20 am, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI