Poco चा ‘हा’ नवीन 5जी फोन 9 डिसेंबरला भारतात होईल लाँच, जाणून घ्या फोनची किंमत आणि फिचर्स
Poco चा नवीन 5G फोन भारतात 9 डिसेंबर रोजी लाँच होईल. लाँच होण्यापूर्वी, कंपनीने फोनच्या डिस्प्ले साईज, रिझोल्यूशन आणि रिफ्रेश रेटबद्दल तपशील उघड केले आहेत. चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

पोको कंपनीचा नवीन स्मार्टफोन Poco C85 5G 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँच होण्यापूर्वी चिनी स्मार्टफोन निर्मात्याने फोनचा डिस्प्ले आकार, रिझोल्यूशन आणि रिफ्रेश रेट उघड केला आहे. नुकत्याच लाईव्ह झालेल्या आगामी हँडसेटसाठी समर्पित मायक्रोसाइटवरून असे दिसून आले आहे की तो देशात फ्लिपकार्टवर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये विकला जाईल. टीझरमध्ये त्याची जाडी 7.99 मिमी असल्याचे देखील दिसून आले आहे. Poco C85 5G या फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी असल्याची पुष्टी झाली आहे, जी 106 तासांपेक्षा जास्त म्युजिक प्लेबॅक देण्याचा दावा करते. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.
Poco C85 5G ची संभाव्य फिचर्स
X वरील एका पोस्टमध्ये Xiaomi सब-ब्रँडने खुलासा केला आहे की आगामी Poco C85 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा डिस्प्ले, 810 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HD+ रिझोल्यूशन असेल. शिवाय फ्लिपकार्टवरील Poco C85 5G मायक्रोसाइट अपडेट करण्यात आली आहे, ज्यामुळे फोनची स्क्रीन कमी निळा प्रकाश, फ्लिकर-फ्री आणि सर्कॅडियनसह अनेक TUV प्रमाणपत्रांसह येईल याची पुष्टी केली आहे. त्यातच आऊटडोर लिसनिंगकरिता 200 टक्के सुपर व्हॉल्यूम मोड देखील असेल.
आधी सांगितल्याप्रमाणे Poco C85 5G भारतात 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच होईल. भारतात हा फोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल. टीझरनुसार यात समोर वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले असेल ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल.
Poco C85 5G मध्ये 6000mAh बॅटरी असेल, जी 29 तासांपेक्षा जास्त सोशल मीडिया ब्राउझिंग, 16 तासांपेक्षा जास्त इंस्टाग्राम रील्स स्क्रोलिंग, 106 तासांपेक्षा जास्त संगीत प्लेबॅक आणि 23 तासांपेक्षा जास्त व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्रदान करण्याचा दावा केला जातो.
त्यातच या फोनला 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 10W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करेल, ज्यामुळे फोन सुमारे 28 मिनिटांत 1% ते 50% पर्यंत चार्ज होईल. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी एआय कॅमेरा असेल.
अहवालांनुसार Poco C85 5G हा ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ प्रोसेसरद्वारे चालवला जाईल, ज्यामध्ये दोन आर्म कॉर्टेक्स ए76 कोर आणि सहा आर्म कॉर्टेक्स ए55 कोर असू शकतात, ज्याचा वेग 2.20GHz आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर चालण्याची अपेक्षा आहे.
