5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरावाला बजेट स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, मोबाईलमध्ये काय असेल खास?

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी रियलमी (Realme) आता एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. या फोनचं नाव रियलमी 9 प्रो (Realme 9Pro) असं असेल. या स्मार्टफोनबाबत लीक्सद्वारे बरीच माहिती समोर आली आहे.

5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरावाला बजेट स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, मोबाईलमध्ये काय असेल खास?
प्रातिनिधिक फोटो (Photo Source: www.realme.com/in/)
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:02 PM

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी रियलमी (Realme) आता एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. या फोनचं नाव रियलमी 9 प्रो (Realme 9Pro) असं असेल. या स्मार्टफोनबाबत लीक्सद्वारे बरीच माहिती समोर आली आहे. सर्वात लेटेस्ट लीक्समध्ये या लेटेस्ट मोबाइल फोनच्या (Latest mobile phone) स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला होता. मायस्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी सांगितलं की, हा मोबाईल तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाईल. ज्यामध्ये 128 जीबी व्हेरिएंटचादेखील समावेश असेल. तसेच यामध्ये 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय दिला जाईल. तथापि, कंपनीने या फोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

रियलमीच्या या आगामी स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी, 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Realme 9 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Reality 9 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल इतके आहे. यात सुपर AMOLED पॅनेल आहे आणि त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा डिस्प्ले 339ppi पिक्सेल डेन्सिटीसह येईल. हा डिस्प्ले HDR 10 ला सपोर्ट करेल.

Realme 9 Pro चा संभाव्य प्रोसेसर आणि रॅम

Realme चा हा मोबाइल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटसह येतो. त्याचं क्लॉक स्पीड 2.2Ghz आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेजचा पर्याय आहे.

Realme 9 Pro ची संभाव्य बॅटरी

रियलमी 9 प्रो मध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते. हा फोन Android 11 आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. हा फोन WiFi 6, Bluetooth v5.0 वर काम करतो. हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल. यात टाइप सी यूएसबी पोर्ट मिळेल. यासोबतच यामध्ये 3.5 मिमीचा जॅकही मिळेल.

Realme 9 Pro चा संभाव्य कॅमेरा सेटअप

Realme 9 Pro च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वापरण्यात आले आहे. यात 8 मेगापिक्सेलची सेकेंडरी लेन्स देण्यात आली आहे. यामधील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. या फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपच्या मदतीने, 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतील. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी याच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त

GB/128GB, ट्रिपल रिअर कॅमेरा Realme चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी, दर महिन्याला 92.6 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्सचा टप्पा पार

(Realme 9Pro set to launch in India, know price and features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.