AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 जुलै रोजी लाँच होणार Realme चे नवीन इयरबड्स, एकदा चार्ज केल्यानंतर ५० तासांपर्यंत चालणार बॅटरी

Realme Buds T200 TWS इयरफोन्स भारतात 24 जुलै रोजी लाँच केले जाणार आहे. हे बड्स Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G स्मार्टफोन्ससह लाँच केले जातील. चला तर मग आजच्या या लेखात आपण या इयरफोन्सचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

24 जुलै रोजी लाँच होणार Realme चे नवीन इयरबड्स, एकदा चार्ज केल्यानंतर ५० तासांपर्यंत चालणार बॅटरी
realme buds
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 4:53 PM
Share

रिअलमी कंपनीने त्यांचा Realme Buds T200 True Wireless Stereo (TWS) इयरफोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार असल्याचे सांगितले आहे. तर हे इयरफोन त्यांच्या Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G श्स स्मार्टफोन्ससोबत लाँच करणार आहे. तर हे Realme Buds T200 हे इयरफोन ड्रीमी पर्पल, निऑन ग्रीन, मिस्टिक ग्रे आणि स्नोई व्हाइट, या चार रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तर यामध्ये 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. हे बड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) ला सपोर्ट करतात आणि एका चार्जवर केससह 50 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

Realme Buds T200 TWS इयरफोन्स भारतात 24 जुलै रोजी संध्याकाळी 7:00 वाजता लाँच होतील. तसेच हे बड्स Realme.com आणि Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.

Realme Buds T200 चे स्पेसिफिकेशन्स

बड्स टी200 इयरफोन्सचे काही स्पेसिफिकेशन रिअलमी इंडिया वेबसाइटवर सूचीबद्ध केले आहेत. तर या बड्सचे 20Hz–40,000Hzफ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स रेंजसह 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. या इयरफोन्समध्ये क्वाड माइक सिस्टम आणि एएनसी कार्यक्षमता आहे, जी 32 डीबी पर्यंत अनवॉन्टेड नॉईस कॅन्सल करण्याचा दावा केला आहे.

गेमिंगसाठी Realme Buds T200 इयरफोन्स 45ms लो-लेटन्सी गेम मोड देतात. यासाठी यामध्ये ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी आहे, जी LDAC कोडेकला सपोर्ट करते. त्यांना IP55 रेटिंग आहे, जे धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक आहे.

Realme Buds T200 मध्ये हाय-रेझ ऑडिओ सर्टिफिकेशन आणि 3D स्पेशियल ऑडिओ सपोर्ट आहे. ते ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि इन-इअर डिझाइनसह येतात.

Realme Buds T200 केससह एकूण 50 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा कंपनीने केला आहे. ANC चालू असताना ते 35 तासांपर्यंत बॅटरी टिकू शकते. हे इयरफोन 10 मिनिटांच्या जलद चार्जसह5 तासांचा संगीत प्लेबॅक वेळ देऊ शकतात.

बड्स टी200 इयरफोन्स Realme 15 5जी आणि Realme 15 प्रो 5जी सोबत लाँच होतील. Realme 15 5जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300+ प्रोसेसर आहे, तर प्रो व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.