Realme चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, 5000mAh ची बॅटरी आणि हायटेक फीचर्स मिळणार

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) आज रशिया आणि फिलीपिन्समध्ये Realme C11 (2021) स्मार्टफोन लाँच केला आहे.

Realme चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, 5000mAh ची बॅटरी आणि हायटेक फीचर्स मिळणार
Realme C11
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 10:57 PM

मुंबई : चीनची सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) आज रशिया आणि फिलीपिन्समध्ये Realme C11 (2021) स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. Realme सी 11 (2021) मागील वर्षी लॉन्च झालेल्या रियलमी सी 11 चे अपग्रेडेड मॉडेल आहे. 8 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि उत्तम फीचर्ससह सज्ज असलेला हा स्मार्टफोन परवडणार्‍या श्रेणीतील इतर स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल. Unisoc प्रोसेसरसह हा रियलमी स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. (Realme C11 2021 launched, check Price in India, Specifications)

या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास फिलिपिन्समध्ये रियलमी सी 11 (2021) च्या 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4990 PHP म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 7,600 रुपये आहे. त्याचबरोबर रशियामधील रियलमी सी 11 (2021) ची सुरुवातीची किंमत 7,415 RUB म्हणजेच भारतीय चलनानुसार 7,327 रुपये निश्चित केली गेली आहे. रियलमी सी 11 (2021) सध्या रशियामधील AliExpress वेबसाइट आणि फिलिपिन्समध्ये Lazada वेबसाइट वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Realme C11 चे स्पेसिफिकेशन्स

Realme C11 (2021) च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.50 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचं रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल इतकं आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर कोर Unisoc SC9863 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल सांगायचे तर यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस आहे, जी स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येईल.

दमदार बॅटरी आणि कॅमेरा

या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमविषयी बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतो. बॅटरी बॅकअपच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जरसह चार्ज केली जाऊ शकते. कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर यात 8 मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा आहे, ज्यासह फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फीचर्स

या फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ v 5.00, यूएसबी ओटीजी, मायक्रो यूएसबी, 3.5mm हेडफोन जॅक आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. तसेच यामध्ये Lake Blue आणि Oron Grey असे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Flipkart Sale : Motorola च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट

Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

(Realme C11 2021 launched, check Price in India, Specifications)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.