AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रियलमीच्या ‘या’ नवीन फोनची बॅटरी इतकी मोठी आहे की दिवसभर चार्जिंगची चिंता मिटेल, जाणून घ्या किंमत व खास फिचर्स

रियलमीचा हा नवीन फोन लाँच झाला असून यात 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि 144Hz डिस्प्ले आहे. या बजेट 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा अनेक प्रभावी वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि विक्रीच्या संपूर्ण तपशिलाबद्दल जाणून घेऊयात.

रियलमीच्या 'या' नवीन फोनची बॅटरी इतकी मोठी आहे की दिवसभर चार्जिंगची चिंता मिटेल, जाणून घ्या किंमत व खास फिचर्स
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 12:40 PM
Share

रियलमीने जागतिक बाजारपेठे त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme C100 5G लाँच केला आहे. हा कंपनीच्या सी सीरीजमधील नवीनतम फोन असून तो ई-कॉमर्स साइट्सवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 THB भारतीय चलनानुसार अंदाजे 20 हजार रूपयांपासून सुरू होते. याचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट अंदाजे 21 हजार रूपयांमध्ये उपलब्ध होईल. हा फोन २२ एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी

या फोनची 7000mAh एवढी मोठी बॅटरी हे एक पॉवरफूल वैशिष्ट्य आहे. एवढ्या मोठ्या बॅटरीमुळे तुम्ही दिवसभर आरामात फोन वापरू शकता. यात 45W फास्ट चार्जिंगची सोय देखील आहे, ज्यामुळे जलद चार्जिंगची खात्री मिळते.

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 144Hz रिफ्रेश रेट असलेली मोठी 6.8-इंचाची HD+ LCD स्क्रीन आहे. याचा अर्थ स्क्रोलिंग आणि गेमिंग अतिशय सुरळीत होते. तसेच यात 900-निट ब्राइटनेस आहे, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते.

कार्यक्षमतेसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे, जो दैनंदिन वापर आणि हलक्या गेमिंगसाठी चांगला मानला जातो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते.

कॅमेरा सुद्धा दमदार

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी योग्य आहे.

या फोनमध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखी आवश्यक वैशिष्ट्ये देखील आहेत. सुरक्षेसाठी, यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

Realme C100 5G हा दीर्घ बॅटरी लाईफ आणि स्मूथ डिस्प्ले असलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक आहे. जर तुम्ही 20 हजार पेक्षा कमी किमतीचा आणि जास्त काळ टिकणारा फोन शोधत असाल, तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Follow Us
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....