AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme 16 : रिअलमी कंपनीने भारतात आणला स्लीम फोन, 7000mAh बॅटरी क्षमता, किंमत किती ?

रिअलमी कंपनीने भारतात Realme 16 स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनचे डिझाईन स्लीम असून IP69 रेटिंगसह आणि 7000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरी सह हा फोन बाजारात उतरवण्यात आला आहे.

Realme 16 : रिअलमी कंपनीने भारतात आणला स्लीम फोन, 7000mAh बॅटरी क्षमता,  किंमत किती ?
realme 16 5G
| Updated on: Apr 02, 2026 | 4:50 PM
Share

रिअलमीने भारतीय बाजारात Realme 16 स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोन स्लीम डिझाईन आणि मोठ्या बॅटरीसोबत मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या IP69 रेटिंग आणि 7000mAh क्षमतेची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला खरेदी करण्याच्या विचारात आहात तर याची वैशिष्ट्ये आणि किंमत काय हे जाणून घेऊयात…

फोन 31999 रुपये

Realme 16 5G स्मार्टफोनचे डिझाईल आणि बिल्डचा विचार केला तर यात प्लास्टिक फ्रेम देण्यात आली आहे. तसेच याचा बॅक पॅनल देखील प्लास्टिकचे आहे. यात कंपनीने युनिक पॅटर्न दिला आहे. फोनचा कॅमेरा मॉड्युल मेटलचे आहे. ज्यात ‘सेल्फी मिरर’ देखील मिळत आहे. फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी असूनही फोन खूपच स्लीम आणि वजनाने हलका वाटतो.या फोनला IP69 रेटिंग आणि DT Star 2 Plus प्रोटेक्शनसह बाजारात उतरवले असून फोनला सुरुवातीच्या 31,999 रुपये किंमतीसह उतरवण्यात आले आहे.

डिस्प्ले

रिअलमीच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पिक ब्राईटनेस 4500 निट्स आहे. 30 हजाराहून जास्त किंमत असलेल्या या फोनमध्ये HDR सर्टिफिकेशनचे सपोर्ट मिळत नाही. ज्यामुळे Netflix वा YouTube वर HDR कंटेन्ट पाहू शकणार नाहीत. ही बाब थोडी निराशा करते. या फोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. ज्याचा रिस्पॉन्स सरासरी आहे.

कॅमरा

रिअलमी 16 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. परंतू कॅमेरा मॉड्युलचे डिझाईन असे आहे की ज्याला पाहिल्या नंतर वाटते की यात तीन कॅमेरे आहेत. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलवाला Sony IMX 852 आहे. दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी देखील फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा लेन्स दिला आहे.कॅमेरा परफॉर्मन्सचे बोलायचे झाले तर दिवसाच्या उडेडात पोर्ट्रेट फोटो चांगले येतात. परंतू सामान्य फोटोत स्कीन टोन खूप येलोईश आणि वार्म इफेक्ट वाला दिसतो. या फोनमध्ये अल्ट्रावाईड लेन्सची कमतरता वाटते. लो-लाईटमध्ये फोटो ब्लर होतो आणि डिटेल्सची कमतरता जाणवते.

परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेयर

यात MediaTek Dimensity 6400 Turbo चिपसेट आहे. 30,000 रुपयांत हा चिपसेट कमजोर आहे. कारण हा सर्वसाधारणपणे 15,000 च्या फोनमध्ये देखील मिळतो. गेमिंगचा विचार केला तर BGMI सारख्या हेवी गेम्ससाठी हा फोन योग्य नाही. याचा टच रिस्पॉन्स स्लो आहे.ज्यामुळे गेमिंग अचूकता मिळत नाही. हा फोन एंड्रॉईड 16 वर आधारित Realme UI 7 वर रन करतो. कंपनीचे म्हणणे आहे की 3 वर्षांसाठी OS आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेट मिळते. मात्र,यात खूप जास्त ब्लोटवेअर मिळतात, जो फोनला स्लो करतो.

बॅटरी आणि चार्जिंग

रिअलमीमध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. मॉडरेट युजेसवर सुमारे 1.5 दिवसाचा बॅकअप ऑफर करते. फोनच्या बॉक्समध्येय 60W चा चार्जर मिळतो. फोनला 1% ते 100% चार्ज होण्यास 1.5 तास लागतो.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.