.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme चे दोन ढासू 5G स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme उद्या (4 फेब्रुवारी) भारतात दोन ढासू स्मार्टपोन लाँच करणार आहे.

Realme चे दोन ढासू 5G स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स
आता 'रिअल मी'च्या स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी टेक्नोलॉजी
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 03, 2021 | 10:57 PM
Share

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme उद्या (4 फेब्रुवारी) भारतात दोन ढासू स्मार्टपोन लाँच करणार आहे. दुपारी 12.30 वाजता एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये हे दोन्ही फोन लाँच केले जातील. Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. (Realme X7 pro 5G is going to launch tomorrow, know price and specification)

रियलमी कंपनी Realme X7 5G हा स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करणार आहे. यामध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश असू शकतो. या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे 20,000 रुपये आणि 25,999 रुपये असू शकते. दोन्ही स्मार्टफोन्स Dimensity 1000+ 5G प्रोसेसरसह सादर होण्याची शक्यता आहे.

Realme X7 5G चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED फुल HD डिस्प्ले दिला जाईल जो MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह येतो. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली जाईल. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सोबतच या फोनमध्ये 50W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्टसह 4310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल.

Realme X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme X7 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर असेल, यामध्ये सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाईल, जो कॉर्निंग गोरिला ग्लास 5 ने कोटेड असेल. सोबतच या फोनमध्ये 4 रियर कॅमेरे मिळतील. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा असेल जो Sony IMX686 सेन्सरसह येईल. सोबतच यामध्ये 8MP ची वाईड अँगल लेन्स, 2MP ची रेट्रो पोट्रेट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स दिली जाईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh क्षमतेची बॅटरी मिळेल जी 65W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

जबरदस्त कॅमेरा

सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.

हेही वाचा

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

(Realme X7 pro 5G is going to launch tomorrow, know price and specification)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर