सावधान, Jio च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा, ‘ही’ चूक करणं टाळाच

जसजसं तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतसे गुन्हेगार देखील फसवणुकीच्या नवनव्या क्लुप्त्या शोधून काढत आहे.

सावधान, Jio च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा, 'ही' चूक करणं टाळाच
जिओच्या 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये 124 IUC (Internet Usage Charge) मिनिटस आणि 1GB कॉम्प्लिमेंट्री डेटा मिळतो.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 2:45 AM

मुंबई : जसजसं तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतसे गुन्हेगार देखील फसवणुकीच्या नवनव्या क्लुप्त्या शोधून काढत आहे. त्याचमुळे तंत्रज्ञानाचा जसा उपयोग आहे, तसाच त्यापासून काही प्रमाणात सावधानताही बाळगणे सध्याचं गरजेचं झालंय. चोरांनी आपल्या चोरीच्या पद्धती बदलल्या आहेत आणि त्याचा उपयोग करुन अनेकांची फसवणूक होत आहे. त्यात फोन करुन व्यक्तिगत माहिती घेऊन फसवणुकीचे तर अनेक प्रकार समोर आलेत. याशिवाय इतरही अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. म्हणूनच आपली फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क राहणं गरजेचं आहे (Reliance jio send warning message on kyc free data calls messages and fraud).

फसवणुकीचे हे प्रकार लक्षात घेऊनच जिओने आपल्या ग्राहकांना याबाबत सावधान करणारा मेसेज पाठवला आहे. जिओने आपल्या वापरकर्त्यांना या मेसेजमध्ये कोणत्याही संशयित व्यक्तीला आपली माहिती न देण्यास सांगितलंय. जर अशा व्यक्तींकडे आपली व्यक्तिगत माहिती गेली तर मोठी फसवणूक होऊ शकते असाही इशारा देण्यात आलाय.

प्रत्येक ग्राहकाला Jio कडून मेसेज अलर्ट

रिलायन्स जिओने ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, “ग्राहकांनी आपली व्यक्तिगत माहिती कुणालाही देऊ नये. तुमच्या KYC अपडेटसाठी किंवा तुम्हाला मोफत मोबाईट डेटा देण्यासाठी कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सांगणाऱ्या फसव्या मेसेजपासून सावध/सतर्क राहा. कोणत्याही संशयास्पद नंबरवर कॉल करु नका. फसव्या मेसेजेसमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींकडून कॉल आल्यास त्यांना आपली माहिती देऊ नका. सुरक्षित राहा. Team Jio”

जाहिराती आणि प्रमोशनच्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सुटका करायचीय? मग हे करा

जर तुम्हाला तुमच्या फोनवर येणाऱ्या जाहिरात आणि प्रमोशनचे कॉल, मेसेज नको असतील तर तुम्ही ते बंद करु शकता. त्यासाठी तुम्हाला जिओ कस्टमर केअरला कॉल करुन डू नॉट डिस्टर्ब (DND) सर्विस सुरु करण्यास सांगावं लागेल. हे काम तुम्ही My Jio अॅपवर जाऊनही करु शकता. DND पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक मेसेज मिळेल. त्या मेसेजनंतर 7 दिवसांमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवरील जाहिरातीचे कॉल, मेसेज बंद होतील.

हेही वाचा :

गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

जिओला टक्कर, Airtel च्या 2 धडाकेबाज ऑफर, दररोज फायदा

व्हिडीओ पाहा :

Reliance jio send warning message on kyc free data calls messages and fraud

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.