जिओला टक्कर, Airtel च्या 2 धडाकेबाज ऑफर, दररोज फायदा

जिओ आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सला टक्कर देण्यासाठी एअरटेल (Airtel) सातत्याने आपल्या प्लॅन्समध्ये बदल करताना दिसत आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा आणि कॉलिंगच्या अनेक धडाकेबाज ऑफर देण्यात येत आहेत.

जिओला टक्कर, Airtel च्या 2 धडाकेबाज ऑफर, दररोज फायदा
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 4:16 PM

मुंबई : जिओ आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सला टक्कर देण्यासाठी एअरटेल (Airtel) सातत्याने आपल्या प्लॅन्समध्ये बदल करताना दिसत आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा आणि कॉलिंगच्या अनेक धडाकेबाज ऑफर देण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून नुकतेच एअरटेलने 2 स्पेशल प्लॅन आणले आहेत. यातील एका प्रीपेड प्लॅनची किंमत 249 रुपये आणि दुसऱ्याची 298 रुपये अशी आहे. पहिल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि दुसऱ्यात दररोज 2 जीबी डेटा 28 दिवसांसाठी मिळेल. यापेक्षा अधिक किमतीच्या प्लॅन्समध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात आलं आहे (Special plans of Airtel get daily 2GB data with and many more).

जर एअरटेल ग्राहकांनी 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स अ‍ॅपवरुन रिचार्ज केला तर 50 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. सध्या तरी एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये तुम्हाला केवळ 298 रुपये आणि 398 रुपयांचा अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन मिळणार आहे. यावर काही कूपन्स देखील मिळू शकतात.

एअरटेलच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच 28 दिवस अनलिमिटेड कॉलचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएसही करता येणार आहेत. 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटाची मर्यादा वाढली आहे. यात दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसचाही फायदा होणार आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीमचं आणि विंक म्यूजिकचं सब्सक्रिप्शन देखील मिळेल. तसेच 150 रुपयांच्या फास्टॅगचा कॅशबॅकही मिळेल.

एअरटेल थँक्स अ‍ॅपचा फायदा

एअरटेल ग्राहकांना एअरटेलचं थँक्स अ‍ॅप वापरल्यानंतर अधिकचा फायदा होणार आहे. एअरटेल थँक्स अ‍ॅपवरुन रिचार्ज केल्यास ग्राहकांना 50 रुपयांची सूट आणि 2 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. म्हणजेच या अ‍ॅपची किंमत केवळ 248 रुपये होईल. विशेष म्हणजे यात अधिकचा 2 जीबी डेटाही मिळेल.

एअरटेलने नुकताच 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. त्यात 24 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन सध्ये केवळ आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक या टेलिकॉम सर्कलसाठी उपलब्ध आहे. यात अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे. तसेच हॅलोट्यून, विंक म्यूजिक आणि एअरटेल एक्सट्रीमची सुविधाही मिळेल.

हेही वाचा :

खुशखबर ! रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने केली ‘ही’ मोठी घोषणा, ग्राहकांना होणार मोठा फायदा

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

Jio, Airtel आणि Vi ला टक्कर देण्यासाठी BSNL चा ढासू प्लॅन लाँच

Special Report | कोण पुरतंय सर्वात फास्ट इंटरनेट, ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

Special plans of Airtel get daily 2GB data with and many more

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.