Samsung Galaxy S21 FE भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 999 रुपयांत करा बुकिंग

Samsung ने अलीकडेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2022 मध्ये Galaxy S21 FE सादर केला. त्यानंतर हा स्मार्टफोन भारतीय वेबसाइटवर लिस्ट झालेला दिसला. मात्र, लॉन्च दरम्यान डिव्हाइसच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही.

Samsung Galaxy S21 FE भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 999 रुपयांत करा बुकिंग
Samsung Galaxy S21 FE
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 6:18 PM

मुंबई : Samsung ने अलीकडेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2022 मध्ये Galaxy S21 FE सादर केला. त्यानंतर हा स्मार्टफोन भारतीय वेबसाइटवर लिस्ट झालेला दिसला. मात्र, लॉन्च दरम्यान डिव्हाइसच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, आता भारतीय ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा सॅमसंग शॉप अॅपवरून डिव्हाईसची प्री-बुकिंग सुरू करू शकतात. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 11 जानेवारीपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. (Samsung Galaxy S21 FE Pre-Reservation Begins in India with 999 rupees)

Samsung Galaxy S21 FE खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक सॅमसंगच्या भारतीय वेबसाईटला भेट देऊ शकतात. हा फोन प्री-बुक करण्यासाठी 999 रुपये भरावे लागतील. दक्षिण कोरियाच्या टेक दिग्गज कंपनीने आज त्यांच्या ‘फास्टेस्ट चिप’ स्मार्टफोनचा टीझर भारतात जारी केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Exynos 2100 SoC द्वारे संचालित असण्याची शक्यता आहे.

प्री-बुक करणाऱ्यांना Next Galaxy VIP पास

जे युजर्स सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी प्री-बुकिंग करतील, त्यांना ‘Next Galaxy VIP Pass’ मिळेल, ज्यामुळे त्यांना 2,699 किमतीचा Galaxy SmartTag मोफत मिळू शकेल. यात ग्राहक प्री-बुकिंग पास रद्द करणे आणि त्याचा 100% परतावा मिळवण्या पर्यायदेखील निवडू शकतात.

तसेच, Galaxy S21 FE खरेदी केल्यानंतर केलेल्या शेवटच्या पेमेंटमधून प्री-बुकिंग शुल्क वजा केले जाईल. याशिवाय, अॅमेझॉन इंडिया युजर्ससाठी देखील हे डिव्हाईस उपलब्ध असू शकते, कारण डिव्हाईसच्या संपूर्ण फीचर्ससह एक डेडीकेटेड लँडिंग पेज देखील त्यांच्या साईटवर लाईव्ह झाले आहे.

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 FE किंवा फॅन व्हेरिएंट, भारतात सॅमसंगच्या स्वतःच्या Exynos 2100 SoC वर चालेल आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 वर चालणार नाही, जो त्याच्या ग्लोबल व्हेरियंटसह येतो. याशिवाय, इतर वैशिष्ट्ये सारखीच असण्याची अपेक्षा आहे. यात 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB इंटरनल स्टोरेज पर्यायाचा समावेश आहे.

कॅमेरा

यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR 10+ सपोर्टसह 6.4-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X फुल HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1200 nits आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी सेंट्रेड पंच-होल कटआउटमध्ये 32-मेगापिक्सेल f/2.2 सेल्फी कॅमेरा देखील आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 12 मेगापिक्सेल f/1.8 प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सेल f/2.2 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 3X ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्टसह 8-मेगापिक्सेल f/2.4 टेलिफोटो कॅमेरा आहे.

इतर फीचर्स

Samsung Galaxy S21 FE मध्ये अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 4,500mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालेल.

डिव्हाईसमध्ये सॅमसंगचे वायरलेस पॉवरशेअर फिचर देखील आहे, जेणेकरुन इतर डिव्हाईसेसना वायरलेस पद्धतीने चार्ज करण्यात देखील मदत होईल. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी याला IP68 रेटिंग मिळाले आहे. Samsung Galaxy S21 FE सुमारे 50,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Samsung Galaxy S21 FE Pre-Reservation Begins in India with 999 rupees)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.