AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy S25 FE इतक्या स्वस्तात उपलब्ध, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

फ्लिपकार्ट फ्रीडम सेल दरम्यान Samsung Galaxy S25 FE आणि फ्लॅगशिप Galaxy S25 वर मोठी सूट मिळणार आहे. 8 ऑगस्टपासून गॅलेक्सी एस25 एफई मोठ्या सवलतीत उपलब्ध होईल. चला तर मग या खास ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy S25 FE इतक्या स्वस्तात उपलब्ध, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Samsung Galaxy S25 FE
| Edited By: | Updated on: Aug 07, 2026 | 4:01 PM
Share

फ्लिपकार्टचा ‘फ्रीडम सेल’ या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या थीमवर आधारित या विशेष सेलमध्ये फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी सदस्यांना लवकर प्रवेश मिळेल आणि प्रमुख ब्रँड्सच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर सवलत दिली जाईल. या सेलदरम्यानSamsung Galaxy S25 FE सवलतीच्या दरात उपलब्ध असेल हे निश्चित झाले आहे. हा फॅन एडिशन स्मार्टफोन एक्सिनोस 2400 प्रोसेसरवर चालतो आणि यात 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेलदरम्यान साध्या गॅलेक्सी एस25 वरही सवलत दिली जाईल. चला तर मग या ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

फ्लिपकार्ट फ्रीडम सेल दरम्यान Samsung Galaxy S25 FE वर सवलत

फ्लिपकार्ट फ्रीडम सेलच्या विशेष मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, सॅमसंग गॅलेक्सी एस25 एफई सेलदरम्यान 47 हजार 999 रूपयांना फोन उपलब्ध होईल. इच्छुक खरेदीदार दरमहा 8 हजार 333 रुपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआय ऑफरसह हा हँडसेट खरेदी करू शकतील. या सवलतीच्या किमतीमध्ये फ्लॅट डिस्काउंट आणि बँक-आधारित ऑफर्स या दोन्हींचा समावेश आहे.

त्याचबरोबर गॅलेक्सी एस25 एफई सध्या फ्लिपकार्टवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 54 हजार 999 रूपयांना सूचीबद्ध आहे. त्याच रॅमसह 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 65 हजार 999 रूपये आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 77 हजार 999 रूपये होती. हा हँडसेट गेल्या वर्षी भारतात 59 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच झाला होता.

त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट फ्रीडम सेल दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस25 त्याच्या मूळ किंमत 74 हजार 999 रूपयांवरून कमी होऊन 57 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होणार असल्याची पुष्टी झाली आहे. ईएमआय ऑफर्स 9 हजार 999 रूपयांपासून सुरू होईल.

फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 8 ऑगस्टपासून सुरू होणार असून, प्लस आणि फ्लिपकार्ट ब्लॅक सदस्यांना 7 ऑगस्टपासून 24 तासांचा अगोदरचा प्रवेश मिळेल. या सेलदरम्यान खरेदीदारांना एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10% त्वरित सूट मिळू शकेल. खरेदीदारांना नो-कॉस्ट ईएमआय ऑफर्स आणि एक्सचेंज डिस्काउंट्स देखील मिळतील. तर हा सेल कोणत्या दिवशी संपणार आहे याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

गॅलेक्सी एस25 एफई फिचर्स

गॅलेक्सी एस25 एफई मध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात आर्मर ॲल्युमिनियम फ्रेम असून ते IP68-रेटेड बिल्डसह येते.

यात एक्सिनोस 2400 प्रोसेसर असून 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 4,900mAh क्षमतेची बॅटरी असून 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती