AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smartphone Tips: स्लो मोबाईलला जोर का झटका! स्मार्टफोन होणार शक्तिमान, ते गोल्डन रूल्स माहिती आहेत का?

Smartphone tips to better speed: स्मार्टफोन स्लो झाला आहे का? त्याचा वेग मंदावला आहे का? या अशक्त फोनला शक्तिमान करण्यासाठी काय आहेत ते गोल्डन रूल्स, जाणून घ्या...

Smartphone Tips: स्लो मोबाईलला जोर का झटका! स्मार्टफोन होणार शक्तिमान, ते गोल्डन रूल्स माहिती आहेत का?
स्मार्टफोन असा होईल शक्तिमानImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 08, 2026 | 2:26 PM
Share

Smartphone tips to better speed: आज जग जणू स्मार्टफोनवर आलंय. किराण्यापासून ते दुधापर्यंत सर्व वस्तू स्मार्टफोनमधील प्लॅटफॉर्मवरून मागवता येतात. तर त्याचे ऑनलाईन पेमेंटही करता येते. इतकेच पार अमेरिकेतील मित्राला व्हॉट्सॲपवर गप्पा मारता येतात. सोशल मीडियावर जुने मित्र हुडकता येतात. त्यांच्या जीवनातील घडामोडी जाणून घेता येतात. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने त्याचा वेग मंदावला आहे. अशावेळी अनेक जण तो रिस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. दीर्घ प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी जसे आपण ताणून देतो. तसेच फोनला सुद्धा आरामाची गरज असते. रिस्टार्ट केल्याने खरंच स्मार्टफोन रिफ्रेश होतो का? त्याची कामगिरी सुधारते का?

स्मार्टफोन करा रीस्टार्ट

अनेकांच्या मनात येते की स्मार्टफोन रिस्टार्ट करावा की नाही? जर तुमचा मोबाईल अचके देत असेल. त्याचा वेग मंदावला असेल अथवा तासनतास गेम खेळत असाल, त्यावर एडिटिंगचे काम करत असाल तर मोबाईलला एकदा रिस्टार्ट जरूर करा. त्यामुळे कॅची फाईल्स आणि इतर फाईल्सचा अडथळा दूर होतो. पण फोन रोज रीस्टार्ट करण्याची गरज नाही. पण जर तुमचा फोनचा अतिवापर असेल अथवा तुम्ही त्यावर गेम खेळत असाल, व्हिडिओ एडिटिंग अथवा सोशल सफरिंग करत असाल तर मात्र तुम्ही दोन ते तीन दिवसाआड फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे.

काय आहे गोल्डन रूल?

अनेक टेकतज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी मोबाईल रिस्टार्ट करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे फोनची टेम्पररी मेमरी (RAM) संपूर्ण रित्या स्वच्छ होते. छोटे वा खतरनाक बग्स, जे सिस्टिम स्लो करतात ते नष्ट होतात. याप्रकारामुळे वारंवार फोन बंद करण्याची गरज भासणार नाही. तुमच्या फोनचा स्पीड वाढेल. तो शक्तिमान होईल आणि लोण्यासारखा काम करेल. तुम्हाला मोबाईल वापरताना अडचण येणार नाही. अर्थात तुमचा इंटरनेटचा स्पीडही चांगला असायला हवा.

ज्याचा वापर कमी त्याने काय करावं?

जर तुमचा स्मार्टफोनचा वापर अत्यंत कमी असेल. फोन केवळ कॉल्स आणि मॅसेजसाठी वापर असाल तर महिन्यातून एकदा स्मार्टफोन रीस्टार्ट करणे हा चांगला पर्याय आहे. पण असे युझर्स बोटावर मोजण्या इतके आहेत. कारण आज सोशल मीडियाच्या मायाजाळात प्रत्येक जण रील्स पाहतो अथवा गेम्स खेळतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलला ही क्षणिक विश्रांतीची गरज आहे हे ओळखा, तरच तो दीर्घकाळ चांगली कामगिरी करेल.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ