AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची ‘या’ बातमीने होणार निराशा; पुढील सहा महिन्यांत मोठा भुर्दंड सोसावा लागणार

कोरोना महामारीत आधीच चहूबाजूंनी महागाईचा तडाखा बसला असतानाच आता स्मार्टफाने वापरकर्त्यांना 30 टक्के वाढीव बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची ‘या’ बातमीने होणार निराशा; पुढील सहा महिन्यांत मोठा भुर्दंड सोसावा लागणार
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची ‘या’ बातमीने होणार निराशा
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 8:44 AM
Share

नवी दिल्ली : स्मार्टफोन वापरणारे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे प्रीपेड आणि दुसरा प्रकार म्हणजे पोस्टपेड. दोन्ही योजनांचे स्वत:चे असे वेगवेगळे फायदे आहेत. काही जण प्रीपेड प्लॅन घेतात, कारण त्यांना ती योजना स्वस्त वाटते. काही लोक पोस्टपेड प्लान घेतात, कारण त्यांना अशा प्लानमध्ये अनेक फायदे दिसतात. पण आता या दोन्ही प्लानच्या वापरकर्त्यांना अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. होय, स्मार्टफोन वापरकर्त्यांचे बिल पुढील 6 महिन्यांत 30 टक्क्यांनी वाढणार आहे. कोरोना महामारीत आधीच चहूबाजूंनी महागाईचा तडाखा बसला असतानाच आता स्मार्टफाने वापरकर्त्यांना 30 टक्के वाढीव बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. (Smartphone users will be disappointed with the news; The next six months will be very difficult)

या कंपन्यांचे प्लान महागणार

एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्सचे प्लान महाग केले आहेत, तर इतर टेलिकॉम कंपन्याही आता अशीच पावले उचलत आहेत. एअरटेलने आपला एण्ट्री प्लान 60 टक्क्यांनी महाग केला आहे. म्हणजेच आधी 49 रुपयांमध्ये उपलब्ध होणारा प्लान आता 79 रुपयांचा करण्यात आला आहे. याशिवाय व्होडाफोन आयडियानेही आपल्या काही सर्कलमध्ये आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे.

जसजसे प्लान महाग होत आहेत, तसतसे ते प्लान लागूसुद्धा केले जात आहेत. कंपनी आधीच तोट्यातून वाटचाल करीत असल्याने व्होडाफोन आयडियाने आपल्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. या तोट्यातून सावरण्यासाठी कंपनीला प्लान महाग करणे अपरिहार्य झाले आहे. टेलिकॉम उद्योगात 90 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक हे प्रीपेड प्लान्सचे वापरकर्ते आहेत.

कॉपोर्रेट ग्राहकांसाठी डेटा फायद्यांमध्ये कपात

दुसरीकडे व्होडाफोन आयडियाने आपल्या कॉपोर्रेट ग्राहकांसाठी बिझनेस प्लस पोस्टपेड प्लानअंतर्गत डेटा फायद्यांमध्ये कपात केली आहे. दोन्ही कंपन्या विशेषत: व्होडाफोन आयडिया भाडे आणि सरासरी महसूलावर वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहेत. जर विश्लेषकांच्या मानले तर सध्या सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेली जिओ ही एआरपीयू ग्रोथच्या किंमतीवर वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढवण्याकामी व्यस्त आहे. व्होडाफोन आयडियाची स्थिती सध्या वाईट आहे. कंपनीला 2022 पर्यंत 22,000 कोटी रुपये भरायचे आहेत. यासाठी कंपनीला रोख रक्कम हवी आहे आणि यामुळेच आता कंपनी तातडीने दर वाढवत आहे. दरवाढीशिवाय दुसरा पर्याय कंपनीकडे नसल्याचेच सध्याचे चित्र आहे. (Smartphone users will be disappointed with the news; The next six months will be very difficult)

इतर बातम्या

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपूर्वी अपडेट करा केवायसी

Bank Fraud : बँक खात्यात फसवणूक झाली असेल तर केवळ 10 दिवसातच मिळतील पूर्ण पैसे, फक्त करा हे काम

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.