पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त 5 वर्षात मिळवा 7 लाख, जाणून घ्या गुंतवणुकीची प्रक्रिया आणि इतर तपशील

या पोस्ट ऑफिस योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये किमान 1000 रुपये देऊन खाते उघडता येऊ शकते, मात्र कमाल रकमेची कोणतीही मर्यादा यात नाही. या योजनेत गुंतवणुकीवर 100 टक्के सुरक्षा हमी आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त 5 वर्षात मिळवा 7 लाख, जाणून घ्या गुंतवणुकीची प्रक्रिया आणि इतर तपशील
आता इंडिया पोस्ट ऑफर करणार गृह कर्ज
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 29, 2021 | 9:01 PM

नवी दिल्ली : लोक पोस्ट ऑफिसच्या योजना विश्वसनीय मानतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर त्याची टाइम डिपॉजिट स्कीम फायदेशीर ठरू शकते. यात आपले पैसे दुप्पट होऊ शकतात. या योजनेमध्ये आपण 1 ते 5 वर्षे गुंतवणूक करू शकता. यामध्ये सध्या वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. (Get Rs 7 lakh in just 5 years in Post Office’s these scheme, know the investment process and other details)

केवळ 1000 रुपयात उघडता येते खाते

या पोस्ट ऑफिस योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये किमान 1000 रुपये देऊन खाते उघडता येऊ शकते, मात्र कमाल रकमेची कोणतीही मर्यादा यात नाही. या योजनेत गुंतवणुकीवर 100 टक्के सुरक्षा हमी आहे. हे खाते सिंगल आणि एकत्रितपणे उघडले जाऊ शकते. जर मुलाच्या नावे खाते उघडायचे असेल तर पालक ते उघडू शकतात.

योजनेचे फायदे

1. आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी नुसार या योजनेत केलेल्या गुंतवणूकीला सूट देण्यात आली आहे. 2. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढू शकता. तथापि, यासाठी खात्यातून 6 महिने पूर्ण केले पाहिजेत. 3. खाते उघडण्याच्या वेळी किंवा नंतर नामांकन करण्याची सुविधा देखील आहे. 4. जर तुम्हाला दरवर्षी व्याज जमा करायला जायचे नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसला विचारून वार्षिक व्याज तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात हस्तांतरित करू शकता.

जाणून घ्या कसे आहे फायदेशीर ते

ठेव रक्कम : 5 लाख व्याज दर : वार्षिक 6.7 टक्के मॅच्युरिटी कालावधी : 5 वर्षे मॅच्युरिटीची रक्कम : 6,91,500 व्याजाचा लाभ : 1,91,500 (Get Rs 7 lakh in just 5 years in Post Office’s these scheme, know the investment process and other details)

इतर बातम्या

Palmistry Tips : हाताचे तळवे सांगतात व्यक्तीचा स्वभाव, अशा प्रकारे जाणून घ्या त्या व्यक्तीचे प्रत्येक रहस्य

JEE Main 2021 Answer Key: जेईई मेन तिसऱ्या सत्राची उत्तर तालिका जाहीर, डाऊनलोड करण्यासाठी वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें