JEE Main 2021 Answer Key: जेईई मेन तिसऱ्या सत्राची उत्तर तालिका जाहीर, डाऊनलोड करण्यासाठी वाचा सविस्तर

जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची उत्तरतालिका (JEE Main 2021 Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन तिसऱ्या सत्राची ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन उत्तरतालिका पाहू शकतात.

JEE Main 2021 Answer Key: जेईई मेन तिसऱ्या सत्राची उत्तर तालिका जाहीर, डाऊनलोड करण्यासाठी वाचा सविस्तर
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 29, 2021 | 8:21 PM

JEE Main 2021 Answer Key नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची उत्तरतालिका (JEE Main 2021 Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन तिसऱ्या सत्राची ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन उत्तरतालिका पाहू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन तिसऱ्या सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले होते.

उत्तर तालिका डाऊनलोड कशी करायची

स्टेप 1 उत्तर तालिका डाऊनलोड करण्यासाठी Jeemainnta.nic.in या वेबसाईटला भेट द्या स्टेप 2 वेबसाईटवरील होम पेजवरील उत्तर तालिकेच्या लिंकवर क्लिक करा स्टेप 3 त्यानंतर तुमची माहिती सादर करा स्टेप 4 परीक्षा क्रमांक आणि जन्मतारखेदावरे लॉगीन करा स्टेप 5 उत्तर तालिका डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घ्या

आक्षेप घेण्याची संधी?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेन तिसऱ्या सत्राची उत्तरतालिका (JEE Main March Session) जाहीर करण्यासह आक्षेप नोंदवण्यासही मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना उत्तरतालिकेवर आक्षेप असल्यास ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर जाऊन आक्षेप नोंदवू शकतात. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून तिसऱ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका जाहीर करेल.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

जेईई मेन 2021 सत्र 3 च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी 25 ते 27 जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र 3 परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात येईल. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

इंजिनिअरिंग आता मराठीसह 5 प्रादेशिक भाषांमध्ये, 8 राज्यातील 14 महाविद्यालयात कोर्सेस सुरु, नरेंद्र मोदींची माहिती

Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल

JEE Main 2021 Answer Key released by National Testing Agency for JEE Main session 3rd Exam

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें