AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sony Tv : सोनीचा Bravia X75K स्मार्ट टीव्ही लाँच, 16GB स्टोरेज; जाणून घ्या किंमत व स्पेसिफिकेशन्स

सोनीने भारतात आपला नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला आकर्षक फिचर्स मिळणार आहेत. यातील टीव्ही सिरियल्स Google TV सह उपलब्ध होणार असून या लेखातून टीव्हीबाबत इतर माहिती जाणून घेणार आहोत.

Sony Tv : सोनीचा Bravia X75K स्मार्ट टीव्ही लाँच, 16GB स्टोरेज; जाणून घ्या किंमत व स्पेसिफिकेशन्स
Sony TvImage Credit source: Sony
| Updated on: May 04, 2022 | 12:35 AM
Share

मुंबई : सोनी (Sony) कंपनीचे सर्वच प्रोडक्ट (Product) हे प्रीमिअम उत्पादनांसाठी ओळखले जात असते. कंपनीने आपला Sony Bravia X75K स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात लाँच केला आहे. ब्रँडचा नवीन 4K स्मार्ट टीव्ही लाइनअप चार डिसप्ले (Display) आकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या टीव्हीमध्ये Sony X1 प्रोसेसर वापरले असल्याची माहिती आहे. या टीव्हीमध्ये 10W स्पीकर आणि 2K रिझोल्युशन स्क्रीन देण्यात आली आहे. नवीन टीव्ही Google TV वर काम करतो. तुम्हाला या टीव्ही मॉडेलमध्ये क्रोमकास्ट, एअर प्ले आणि होम किटदेखील उपलब्ध होणार आहे. या स्मार्ट टीव्हीची स्पेसिफिकेशन्स पुढील प्रमाणे

किती असेल किंमत?

सोनी टीव्ही सिरीजची किंमत 55,990 रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत 43 इंच मॉडेलचा समावेश होतो. त्याच वेळी Sony Bravia X75K स्मार्ट टीव्हीचे 50 इंच मॉडेल 66,990 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहे. ब्रँडने 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन आकाराच्या प्रकारांची किंमत अद्याप उघड केलेली नाही. ही सर्व मॉडेल्स सोनी सेंटर आणि इतर आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक स्टोअर्ससह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.

स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

नुकत्याच लाँच झालेल्या Sony Bravia X75K स्मार्ट टीव्ही मालिकेत चार स्क्रीनची साइज मिळते. त्यात, 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचा पर्याय उपलब्ध आहेत. टीव्हीमध्ये एलईडी डिसप्ले आहे, जो HDR10 आणि HLG फॉरमॅट सपोर्टसह उपलब्ध आहे. सोनी कंपनीच्या मते, या मालिकेतील मॉडेल्स फुल एचडी आणि 2K रिझोल्यूशन व्हिडिओ क्षमतेसह ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या टीव्हीमध्ये Sony X1 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 16GB इनबिल्ट स्टोरेजसह येते. टीव्हीमध्ये, तुम्हाला Android TV वर आधारित Google TV ऑपरेटिंग सिस्टम मिळते. टीव्ही दोन 10W स्पीकरसह मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, अॅपल एअर प्ले, तीन एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट आहेत. हा टीव्ही गुगल असिस्टंट आणि व्हॉईस कमांड फीचरसह येतो. यामध्ये तुम्हाला हेडफोन जॅक देखील मिळेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.