Super Moon: भर रात्री आकाशात चमत्कार दिसणार, चंद्रासोबत अजब घडणार; ‘या’ वेळेला तुम्हालाही सगळं दिसणार!
Super Moon Timing: रात्रीच्या वेळेस चंद्राचा मंद प्रकाश अनेकांना आवडतो. अनेक खगोलप्रेमी कित्येक तास चंद्राचे निरीक्षण करताना दिसतात. अशातच आज खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आज चंद्र आणखी तेजस्वी होणार आहे.

रात्रीच्या वेळेस चंद्राचा मंद प्रकाश अनेकांना आवडतो. अनेक खगोलप्रेमी कित्येक तास चंद्राचे निरीक्षण करताना दिसतात. अशातच आज खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आज चंद्र आणखी तेजस्वी होणार आहे. कारण आज चंद्र हा तब्बल 30 टक्के मोठा दिसणार आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? हे दृष्य किती वाजता पहायला मिळणार? याबाबत सविस्तर माहिती माहिती जाणून घेऊयात.
आज सुपर मून दिसणार
मुंबईतील प्रख्यात खगोल शास्त्र अभ्यासक दा कृ सोमण यांनी आज आकाशात सुपर मुनचं दर्शन होणार असल्याची माहिती दिली आहे. कारण आज चंद्र पृथ्वीच्या जवळ असणार आहे. उघड्या डोळ्यांनी आज सुपर मुनचं दर्शन होणार आहे. चंद्र नेहमीपेक्षा आकाराने 14 टक्के मोठा दिसणार आहे. चंद्र आज 5 वाजून 44 मिनिटांनी पूर्वेला उगवणार असून आज पूर्ण रात्र चंद्र मोठा दिसणार आहे.
आज रात्रभर चंद्र सामान्य वेळेपेक्षा थोडा मोठा आणि तेजस्वी दिसेल. संपूर्ण वर्षात आज चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. आज रात्री चंद्र वर्षातील सर्वात दूरच्या चंद्रापेक्षा 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी दिसेल. आज चंद्र पृथ्वीपासून फक्त 3,57,000 किलोमीटर दूर असणार आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर हे 3,84,400 किलोमीटर आहे. तसेच चंद्र जेव्हा पृथ्वीपासून सर्वात दूर असतो तेव्हाचे अंतर 4,06,700 किलोमीटर असते.
सुपर मून म्हणजे काय?
आपल्या पृथ्वीचा चंद्र हा पृथ्वीभोवती अंड्याच्या आकाराच्या कक्षेत फिरतो. त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. या काळात चंद्र अधिक मोठा तेजस्वी आणि आकर्षक दिसतो. त्यामुळे हा चंद्र पाहण्यासाठी खगोलप्रेमींसाठी उत्सुकता पहायला मिळते. तुम्हीही आज रात्री सुपर मून पाहू शकता. आकाश मोकळे असेल तर चंद्राची तेजस्वीपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल.
उघड्या डोळ्यांनी पाहता येणार
आज रात्री दिसणारा सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिण किंवा कोणत्याही विशेष उपकरणांची गरज नसेल. मात्र आजचा चंत्र पाहण्यासाठी निरभ्र आकाश असणे गरजेचे असेल. तुम्हाला आज आकाशात नेहमीचा चंद्र आणि आज दिसणाऱ्या चंद्राच्या आकारात आणि प्रकाशाच्या तीव्रतेत नक्कीच फरक जाणवेल.
