टाटा उद्योग समूह ‘अॅपल’मध्ये 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार!

'अॅपल'चा मोबाईल कंपनीचा भारतातील प्लॅन्ट तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार आहे. या प्लॅन्टमध्ये 'अॅपल'साठी लागणारे सुट्या भागांची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे

टाटा उद्योग समूह 'अॅपल'मध्ये 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार!
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 11:48 AM

मुंबई: ‘अॅपल’ या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीने भारतामध्ये आपल्या मोबाईल फोनची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. ‘अॅपल’चा मोबाईल कंपनीचा भारतातील प्लॅन्ट तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार आहे. या प्लॅन्टमध्ये ‘अॅपल’साठी लागणारे सुट्या भागांची निर्मिती केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प उभा करण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (TATA group invest 5 thousand crores in Apple mobile)

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू औद्योगिक वसाहतीमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिस्कला प्रकल्प उभारणीसाठी 500 एकर जागा देण्यात आली आहे. टाटा उद्योग समूह अॅपलसोबतच अन्य घटकावरही गुंतवणूक करणार असून, ती ८ हजार कोटीपर्यंत जाणार असल्याचं कळतंय. दरम्यान, टाटा समूह किंवा तामिळनाडू सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तामिळनाडूतील या प्रकल्पासाठी टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेड अर्थात TEALकडून मदत पुरवली जाणार आहे. या प्रकल्पात पुढील वर्षभरात १८ हजार कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे यात ९० टक्के महिला कर्मचारी असतील असं सांगितलं जात आहे.

तामिळनाडू सरकारची बाजी

अॅपल मोबाईलचा हा प्रकल्प मिळवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये स्पर्धा सुरु होती. पण तामिळनाडू सरकारने यात बाजी मारली. तामिळनाडू सरकारकडून नुकतीच तामिळनाडू इलेक्ट्ऱॉनिक्स हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2020 जारी केली आहे. त्याचबरोबर 2025 पर्यंत इलेक्ट्ऱॉनिक उद्योगात 100 अब्ज डॉलरपर्यंत उत्पादन वाढवण्याचं लक्ष्य तामिळनाडू सरकारनं ठेवल्याचं कळतंय.

संबंधित बातम्या:

टाटा मोटर्सची कमाल, 40 लाख गाड्यांच्या उत्पादनाचा विक्रम

वॉलमार्ट ‘टाटा ग्रुप’मध्ये 1.8 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची चिन्हं, अमेझॉन, रिलायन्सला टक्कर

Navi Mumbai Corona | एन-95 मास्क, पीपीई किट्स, मेडिकल गॉगल्स, टाटा कंपनीकडून नवी मुंबई महापालिकेला 1 कोटी 77 लाखांची वैद्यकीय साधनं

टाटा समुहाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी रसद, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 कोटी, 100 व्हेंटिलेटर्स, 20 रुग्णवाहिका प्रदान

TATA group invest 5 thousand crores in Apple mobile

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.