AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Technology Tips : तुमचा iphone स्लो झाला आहे का? मग या चार सवयी लगेच बदला

फोनची बॅटरी झपाट्याने संपल्याने अनेक वेळा लोक चिंतेत देखील असतात. यामुळे फोन पुन्हा-पुन्हा चार्ज करावा लागतो. मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही.

Technology Tips : तुमचा iphone  स्लो झाला आहे का? मग या चार सवयी लगेच बदला
iPhone Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 14, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : केवळ अॅड्राॅईड स्मार्टफोनच नाही तर तुमचा आयफोन देखील काही कालावधीत मंदावतो (iphone Slow). याचे एक कारण म्हणजे फोनची जागा. यासोबतच तुमच्या काही सवयी देखील फोन स्लो होण्याचे कारण असू शकतात, त्यामुळे आज आपण आयफोनचा स्पीड कसा वाढवता येईल याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयफोनमध्ये मेमोरी स्पेस ठेवा

आयफोन वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाइसमध्ये मोकळी जागा ठेवावी. जागा भरल्यावर iPhone स्लो होऊ शकतो. नवीन अॅप्स आणि iOS अपडेट्स इन्स्टॉल करणे यांसारखी कार्ये अतिरिक्त जागा घेतात. तसेच, फोनमध्ये गाणे आणि व्हिडीओज साठवून ठेवल्यानेही जागा भरते. अशा परिस्थितीत फोनमधून अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. आयफोनची मोकळी जागा जाणून घेण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर General आणि Device Storage वर क्लिक करा. आयफोनमध्ये जलद प्रक्रियेसाठी, सुमारे 1 GB जागा मोकळी असावी.

लो पॉवर मोड बंद ठेवा

लो पाॅवर मोड बॅटरी वाचवण्यासाठी डिझाइन केले आहे. हे तुमच्या फोनची अॅप्स आणि वैशिष्ट्ये देखील मर्यादित करते. यामुळे बॅटरीची बचत होते. पण तुमचा आयफोन स्लो होतो. तुमच्या फोनमध्ये पुरेशी बॅटरी असल्यास, लो पॉवर मोड बंद करा. फोन सेटिंग्जच्या बॅटरी विभागात जाऊन हा मोड एबल आणि डिसेबल केला जाऊ शकतो.

नेहमी बॅटरीचे आयुष्य तपासा

आयफोनच्या बॅटरीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रिचार्जेबल बॅटरीचे आरोग्य बिघडले तरीही फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम का होतो. तसे, iOS त्याची बॅटरी खराब झाल्याची माहिती देते. गरज पडल्यास बॅटरी बदलण्याचाही सल्ला देतो. यासाठी तुम्हाला फोन सेटिंगमध्ये जावे लागेल. नंतर बॅटरी आणि बॅटरी हेल्थ वर टॅप करा. बॅटरी हेल्थ फक्त आयफोनवर दिसत आहे याची जाणीव ठेवा.

फोन रिस्टार्ट करा

तुमच्या iPhone च्या टच स्क्रीनवर टॅपला प्रतिसाद मिळत नसल्यास, तुम्ही सर्वप्रथम iPhone रीस्टार्ट करा. जर अशी समस्या वारंवार येत असेल तर काही अॅप्स याचे कारण असू शकतात.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.