AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले ‘हे’ पाच स्मार्टफोन… किंमत 20 हजारांपेक्षा कमी

भारतात ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखे अनेक प्लॅटफार्म उपलब्ध आहेत. त्यावर विविध ब्रँडचे 108 मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध असलेले मोबाईल्सचे पर्याय देण्यात आले आहे. आज या लेखातून असेच काही 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असणारे स्मार्टफोन्सची माहिती जाणून घेणार आहोत.

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले ‘हे’ पाच स्मार्टफोन... किंमत 20 हजारांपेक्षा कमी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 12:33 PM
Share

भारतात विविध कंपन्यांचे शेकडो मोबाईल उपलब्ध आहेत. अॅमेझॉन (Amazon) तसेच फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही विविध पर्याय डोळ्यासमोर ठेवून स्मार्टफोनची खरेदी करु शकतात. आज आम्ही या लेखातून तब्बल 108 मेगापिक्सल (108 megapixel) कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनबद्दलची माहिती देणार आहोत. या सेगमेंटमध्ये मोटोरोला, रिअलमी, रेडमी सारखे मोठ्या ब्रँडचेही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे या मोबाईल्सची किंमतदेखील अगदी स्वस्त आहे. केवळ 20 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना हे दमदार फिचर्स (Features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

1) मोटोरोला : या मोबाईलमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 16000 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबत यामध्ये 6.78 इंचाची फुल एचडी प्लस डिसप्ले देण्यात आली आहे. बॅक पॅनल ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे.

2) रेडमी : रेडमी नोट 11एस या स्मार्टफोनला केवळ 16200 रुपयांमध्ये खरेदी केले जाउ शकते. यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आल आहे. सोबत याला 6.43 इंचाचा डिसप्ले आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

3) रिअलमी : रिअमली 9 हा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला सर्वाधिक स्वस्त फोन आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबतच यात 6.4 इंचाची फूल एचडी प्लस एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

4) मोटोरोला एज 20 फ्यूजन 5जी : हा मोबाईल फ्लिपकार्टवरुन 21699 रुपयांना खरेदी करता येतो. हा फोन 5जी सपोर्ट आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

5) सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी : हा फोन केवळ 26999 रुपयांमध्ये उपलब्ध अआहे. याला बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा आहे. सोबत सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलला फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 6.7 इंचाचा डिसप्ले आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...