Gadgets : मूर्ती लहान किर्ती महान… ‘हे’ सहा गॅझेट तुमचं काम करतील अगदी सोपं

आम्ही तुमच्यासाठी अशा काही टेक गॅझेटची लिस्ट बनवली आहे, ज्याची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

Gadgets : मूर्ती लहान किर्ती महान... ‘हे’ सहा गॅझेट तुमचं काम करतील अगदी सोपं
होम क्यूब प्लॅस्टिक एलईडी नाईट लाईटImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 3:03 PM

मुंबई : टेक गॅझेटची (Gadgets) क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कंपन्यादेखील ग्राहकांची मागणी ओळखून त्यात नवनवीन बदल करीत आहेत. शिवाय हे सर्व गॅझेट अगदी कमी किंमतीत ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जर तुम्हीदेखील टेकप्रेमी (Tech lover) असाल आणि नवीन कुठले गॅझेट बाजारात आलेय ते जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर हा लेख आवर्जून वाचा. सकाळपासून ते रात्रीपर्यंत संपूर्ण दिवसभर तुम्ही खूप सार्या गॅझेटचा वापर करीत असतात. आपले दैनंदिन कामे हलके व अधिक सोपे करण्यासाठी या गॅझेटला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशा काही टेक गॅझेटची लिस्ट बनवली आहे, ज्यांची किंमत केवळ 500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. याचा वापर केल्याने डे-टू-डे कामे (Day-to-day work) अगदी सोपी होणार आहे.

1)  होम क्यूब प्लॅस्टिक एलईडी नाईट लाईट

होम क्यूब प्लॅस्टिक एलईडी नाइट लाइट एक खूप चांगले गॅझेट आहे. हा एक एलईडी लँप आहे, जो एक युएसबी चार्जिंग सॉकेटसह उपलब्ध आहे. यात 3 लाइटिंग मोड देण्यात आले आहेत. याला unfoldx किंवा अमॅझोनव्दारे खरेदी केले जाउ शकते. हा खूप उपयोगी घटक असून याची किंमत केवळ 500 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

2) ऑल इन वन कार्ड रिडर

ही देखील एक उपयुक्त वस्तू आहे. याव्दारे एकाच वेळी अनेक प्रकारची गॅझेट कनेक्ट करने सोपे होते. हे पेनडाईव्ह, कॅमेरा, मोबाईल, पीसी, लॅपटॉप आणि नोटबूक सारख्या सर्व डिव्हाईससोबत चालू शकते. या कार्ड रिडरमध्ये 3 युएसबी हब आहे. जे हाईस्पीड युएसबी 2.0 कनेक्टिव्हिटीसोबत उपलब्ध होतात. याला अमॅझोनवरुन खरेदी केल्यास याची किंमत 369 रुपये इतकी आहे.

3) फ्रिडल पेन स्टँड कम ब्लुटूथ स्पीकर

हे 2 इन 1 गॅझेट आहे. हे पेन स्टँड आणि ब्लुटूथ स्पीकरसारखं काम करु शकते. या हाइब्रिड स्पीकरमध्ये बिल्टइन मायक्रोफोन देखील देण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. याला अमॅझोनवरुन खरेदी केल्याची यांची किंमत केवळ 389 रुपये आहे.

4) मोबाईल स्क्रीन एक्सपेंडर

जर तुम्ही मोबाईल ऐवजी मोठ्या स्क्रीनवर कंटेंट पाहणे पसंत करत असाल तर, त्यासाठी हे गॅझेट अगदी योग्य आहे. तुम्हाला वाटले तर या बजेट पोर्टेबल प्रोजेक्टरचा वापर करु शकता. हे गॅझेट सुपर थिंक स्क्रीनसह उपलब्ध आहे. याची अमॅझोनवर किंमत 399 रुपये आहे.

5) DFS 5 इन 1 एंटीना पेन

जर तुम्हाला एका ट्रेडिशनल पेनचा सतत वापर करुन कंटाळा आला असेल तर, हा मल्टीपरपज पेन तुम्हाला चांगला अनुभव देउ शकतो. यात खूप सारे फीचर्स देण्यात आलेले आहे. यात टॉर्च, फ्लेशलाइट, मेग्नेट, लेजर प्वाइंटर सारखे अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. हा एका बॉल पेनसारखे काम करतो. याची किंमत केवळ 175 रुपये आहे.

6) boAT basshead 100 ईअर फोन

जर तुम्हाला बाससह येणारा एक चांगला ईअर फोन खरेदी करायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे. boAT basshead 100 ईअर फोन एक खास पध्दतीने बनविण्यात आला आहे. याची किंमत केवळ 379 रुपये ठेवण्यात आली असून हे प्रोडक्ट अमॅझोनवर उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.