32 इंचीचा हा स्मार्ट टीव्ही Flipkart सेलमध्ये मिळणार 10 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही घेण्याच्या विचारात असला तर हा टीव्ही अगदी बजेटमध्ये आहे. आवाजाचे चाहते असणाऱ्यांसाठी ही कंपनी आणखीही काही उत्पादने सेलमध्ये आणणार आहे.

32 इंचीचा हा स्मार्ट टीव्ही Flipkart सेलमध्ये मिळणार 10 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त
स्मार्ट टीव्ही
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 20, 2022 | 7:46 PM

मुंबई, जर्मन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी  Blaupunkt ने सणासुदीच्या आधी 75-इंच मोठ्या स्क्रीन टीव्ही मॉडेल लाँच केले आहे. यासोबतच, Flipkart Big Billion Days देखील 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि सेल दरम्यान, कंपनी आपल्या स्मार्ट टीव्ही मॉडेल्सची डिस्काउंटसह विक्री करेल. यामध्ये 32 इंची टीव्हीची किंमत बजेटमध्ये असेल. सध्या ग्राहकांचे आकर्षण असलेल्या  या 75-इंचाच्या टीव्हीची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल जाणून घेऊया.

वैशिष्ट्ये

ग्राहकांना दर्जेदार आवाजाचा आनंद घेता यावा कंपनीने चार स्पीकर दिले आहेत ज्यात 60 वॅट साउंड आउटपुट आहे. याशिवाय, तुम्हाला डॉल्बी डिजिट प्लस, डॉल्बी व्हिजन, डीटीएस ट्रूसाऊंडसह डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट मिळेल. हा टीव्ही प्रीमियम फीचर्सने भरलेला आहे, नॉइज फिल्टर सारख्या अनेक फीचर्स या टीव्हीमध्ये आकर्षक डिझाइनसह देण्यात आल्या आहेत.

550 निट्स ब्राइटनेस असलेल्या या टीव्ही मॉडेलमध्ये 2 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आहे. हा Google TV 360 डिग्री सराउंड साउंड ऑफर करतो जो तुम्हाला घरी बसून थिएटरसारखा अनुभव देईल. गुगल असिस्टंटसोबत फार फील्ड व्हॉईस कंट्रोल, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5 सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.

किती आहे किंमत

Blaupunkt 75inch TV च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या TV मॉडेलची किंमत 84,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे टीव्ही मॉडेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.

Flipkart सेलमध्ये स्मार्ट टीव्ही मॉडेल्स 80 टक्के सवलतीसह विकल्या जातील, उत्पादन सूट व्यतिरिक्त, तुम्ही Axis आणि ICICI बँक कार्डवर 10 टक्के बचत करू शकाल.  सेलमध्ये केवळ हे 75-इंचाचे टीव्ही मॉडेल विकले जाणार नाही तर कंपनीचे इतर मॉडेल देखील बंपर डिस्काउंटसह विकले जातील.

हे सुद्धा वाचा

32 इंची टीव्हीची किंमत

सेलमध्ये, 32-इंचाचे मॉडेल 9499 रुपयांच्या सवलतीसह विकले जाईल, तर 65-इंचाचे टीव्ही मॉडेल सवलतीनंतर 60,999 रुपयांच्या किंमतीसह विकले जाईल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें