AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000mAh बॅटरी आणि ग्लिफ बारसह लाँच झाला हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स

नथिंगचा हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे, हा लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह अनेक उत्तम फीचर्ससह वापरता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

6000mAh बॅटरी आणि ग्लिफ बारसह लाँच झाला हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स
| Edited By: | Updated on: Jul 08, 2026 | 3:42 PM
Share

नथिंग कंपनीने त्यांचा नवीन ‘B’ सीरीजमधील पहिला स्मार्टफोन, Nothing Phone 4b लाँच केला आहे, ज्यामुळे भारतातील कंपनीच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार झाला आहे. तर हा फोन 29 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना जास्त किंमत न मोजता नथिंग फोनचा अनुभव घेता यावा, हा यामागील उद्देश आहे. या डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, एक नव्याने डिझाइन केलेला ग्लिफ बार आणि 6000mAh बॅटरी आहे. अँड्रॉइड 16 वर चालणारा हा फोन नथिंग ओएस 4.1 या कस्टम स्किनसह येतो. याला तीन वर्षांसाठी ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील.

तर या फोनच्या मागील बाजूस ग्लाइफ बार इंटरफेस आहे, ज्यामध्ये 45 मिनी-एलईडी आहेत. यात स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणारे चार झोन, एक रेकॉर्डिंग लाइट, ग्लाइफ टायमर, महत्त्वाच्या सूचना, लाइव्ह अपडेट्स, व्हॉल्यूम इंडिकेटर, एनएफसी इंडिकेटर, झोपेचे वेळापत्रक आणि कॅमेरा काउंटडाउन यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनच्या किंमती आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात नथिंग फोन 4b ची किंमत

या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 34 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 38 हजार 999 रूपये आहे. या फोनवर 7.5% इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस देखील मिळतो. या किंमतीच्या रेंजमध्ये याची स्पर्धा Motorola Edge 70 Fusion, OPPO F33 Pro 5G, vivo V50 5G आणि realme GT 7T सारख्या स्मार्टफोन्सशी आहे.

नथिंग फोन 4b स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या डिव्हाइसमध्ये 6.77-इंचाचा फुल एचडी+ सॅमसंग सुपर अमोलेड डिस्प्ले असून, तो 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट, 1000Hz इन्स्टंट सॅम्पलिंग रेट आणि 2000 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीचा दावा आहे की, या हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग मिळाले आहे.

चिपसेट: या हँडसेटमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 6th जनरेशन 4 ऑक्टा-कोर प्रोसेसर, सोबतच अॅड्रेनो 810 GPU, क्वालकॉम हेक्सागॉन NPU, क्वालकॉम स्पेक्ट्रा इमेज सिग्नल प्रोसेसर आणि क्वालकॉम AI इंजिन आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशन दिले आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 50-मेगापिक्सलचा सॅमसंग प्रायमरी सेन्सर, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन आणि ऑटोफोकस आहे. 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील उपलब्ध आहे. 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी: फोनला 6000mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी ऊर्जा पुरवते, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी फोनला 0 ते 100% पर्यंत 80 मिनिटांत चार्ज करते असा दावा केला जातो.

कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये 5G, Wi-Fi 6, 4G LTE, ब्लूटूथ व्हर्जन 6, USB टाइप C पोर्ट, GLONASS, GPS सारखी अप्रतिम वैशिष्ट्ये आहेत

Follow Us
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील...
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात.

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की….

जनरल डायर पुन्हा जीवंत झालाय…प्रकाश आंबेडकर यांची २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, म्हणाले की…

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत.

आंदोलकांवर लाठीचार्ज, राज ठाकरे संतापले, जंतरमंतर ते मणिपूर संगळचं काढलं, पोस्ट चर्चेत

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?