AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेबिट कार्डमधील छोटी चिप म्हणजे मिनी कॉम्प्युटर! जाणून घ्या कशी करते काम ?

आजकाल आपल्यापैकी प्रत्येकाकडे डेबिट किंवा एटीएम कार्ड असते. आपण हे कार्ड वापरताना त्यावर असलेली छोटी, सोनेरी रंगाची स्क्वेअर चिप नक्कीच पाहिलेली असते. पण कधी विचार केला आहे का की ही चिप नक्की काय करते?

डेबिट कार्डमधील छोटी चिप म्हणजे मिनी कॉम्प्युटर! जाणून घ्या कशी करते काम ?
This Tiny Chip in Your Debit Card Is a Mini Computer Here is full details of How It WorksImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 2:56 PM
Share

आपण डेबिट कार्ड वापरताना त्यावरील छोटी चिप नक्कीच पाहिलेली असेल, पण ती फक्त डिझाईनसाठी नसते. ही चिप एक मिनी कॉम्प्युटरसारखी काम करते आणि प्रत्येक व्यवहारासाठी युनिक कोड तयार करून तुमच्या पैशांची सुरक्षा करते. आज आपण या चिपच्या कामाविषयी आणि सुरक्षिततेमधील महत्त्व याविषयी थोडी सविस्तर माहिती घेणार आहोत.

ही चिप असते तरी काय?

डेबिट कार्डवर असणारी ही चमकणारी चिप म्हणजे EMV चिप. EMV म्हणजे Europay, MasterCard आणि Visa या तीन कंपन्यांनी मिळून तयार केलेली एक सुरक्षा तंत्रज्ञान प्रणाली आहे. पूर्वीच्या कार्डांमध्ये फक्त मागील बाजूस एक काळी मॅग्नेटिक स्ट्रिप असायची जी कार्डचा सगळा डेटा साठवून ठेवायची. परंतु ही पट्टी सहज क्लोन करता यायची आणि त्यामुळे अनेक फसवणुकीचे प्रकार घडायचे.

पण आता EMV चिप हे काम अधिक सुरक्षित पद्धतीने करते. ही चिप प्रत्येक व्यवहारासाठी एक युनिक सीक्रेट कोड तयार करते. म्हणजेच जर कोणी हा कोड चोरलाही, तरी तो दुसऱ्यांदा वापरता येत नाही.

चिप कशी काम करते?

जेव्हा तुम्ही कार्ड एटीएम किंवा POS मशीनमध्ये टाकता (ज्याला डिपिंग म्हणतात), तेव्हा मशीन आणि चिप एकमेकांशी संवाद साधतात. चिप त्या विशिष्ट व्यवहारासाठी एक युनिक कोड तयार करते. हा कोड एकदाच वापरता येतो, पुन्हा नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होते.

Contactless आणि NFC पेमेंट्स

आताच्या नवीन कार्डांमध्ये Contactless किंवा Tap-to-Pay तंत्रज्ञानही असते. यात कार्ड फक्त मशीनवर हलकेच टॅप केले जाते आणि व्यवहार पूर्ण होतो. हे NFC (Near Field Communication) च्या माध्यमातून कार्यरत असते. पण यातही चिप सुरक्षेची जबाबदारी पार पाडते.

कार्ड एक्सपायर झाल्यावर काय होते?

कार्डची एक विशिष्ट वैधता असते. एकदा कार्ड एक्सपायर झाल्यावर त्यातील चिप बँकेच्या नेटवर्कशी कनेक्ट होणं बंद करते. त्यानंतर बँक नवीन कार्ड आणि नवीन चिप जारी करते. जुनं कार्ड न वापरता येण्याजोगं होतं, पण सुरक्षिततेसाठी ते फाडून फेकणं, विशेषतः चिप असलेला भाग नष्ट करणं आवश्यक असतं.

चिप का जोडली गेली?

भारतासह अनेक देशांमध्ये कार्ड क्लोनिंग आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, EMV चिप अनिवार्य केली गेली. आजच्या घडीला बहुतांश बँका आणि व्यापारी याच चिपयुक्त कार्डांवर व्यवहार स्वीकारतात. काही देश फक्त चिप कार्डच स्वीकारतात, मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड नाही.

ही छोटीशी चिप दिसायला साधी वाटली, तरी ती एक अत्यंत हुशार मिनी कॉम्प्युटर आहे जी तुमच्या पैशांचे रक्षण करते. त्यामुळे पुढच्यावेळी डेबिट कार्ड वापरताना, त्यावरील चिपकडे केवळ डिझाइन म्हणून न बघता, तिच्या कामगिरीची जाणीव ठेवा. कारण हीच चिप आहे जी तुमच्या पैशांना डिजिटल चोरट्यांपासून वाचवते!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.