AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9020mAh बॅटरी असलेला विवोचा ‘हा’ फोन लवकरच भारतात होणार लाँच

विवोचा हा प्रो फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. तसेच हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या विवो टी4 प्रो चा सक्सेसर आहे. त्यात या नवीन हँडसेटमध्ये 9020mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे. चला तर मग हा फोन कधी लाँच होईल ते जाणून घेऊयात.

9020mAh बॅटरी असलेला विवोचा 'हा' फोन लवकरच भारतात होणार लाँच
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 2:02 PM
Share

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने शुक्रवारी घोषणा केली की, कंपनीच्या टी-सिरीजमधील नवीन मॉडेल म्हणून Vivo T5 Pro 5G लवकरच भारतात लाँच केला जाईल. मात्र कंपनीने अद्याप या फोनच्या लाँचची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. याशिवाय एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील लाँच करण्यात आली आहे, ज्यामुळे हे निश्चित होते की हा फोन भारतात या वेबसाइटवर उपलब्ध होईल. यासोबतच कंपनीने आगामी Vivo T5 Pro 5G च्या मुख्य फिचर्स आणि डिझाइनबद्दल काही संकेतही दिले आहेत. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Vivo T5 Pro 5G लवकरच भारतात लाँच होणार

एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये या चीनी टेक कंपनीने खुलासा केला आहे की नवीन Vivo T5 Pro 5G लवकरच भारतात लाँच होईल. इतकेच नाही तर या आगामी फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे, ज्यामुळे या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे भारतात त्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. या फोनमध्ये 9,020mAh क्षमतेची बॅटरी असेल हे देखील निश्चित झाली आहे.

कंपनीचा दावा आहे की, विवो टी सीरीजमधील हा नवीन मॉडेल 9,020mAh बॅटरी असलेला सर्वात स्लिम फोन असेल. विवो टी5 प्रो 5जी भारतात 120 एफपीएस पर्यंतच्या गेमिंग सपोर्टसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये मागील बाजूस पिल-शेप्ड मॉड्यूलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.

डिझाइनच्या बाबतीत फोनच्या डाव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स असतील, तर विवो टी5 प्रो 5जी मध्ये स्पीकर ग्रिल, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट तसेच खालच्या बाजूस एक सिम ट्रे असेल.

तर हा Vivo T5 Pro 5G एप्रिलच्या मध्यात भारतात लाँच होईल. तथापि, लाँचची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाहीये. भारतात याची किंमत 30 हजार 000 ते 35 हजार 000 रूपया दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा Vivo फोन कॉस्मिक ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये 144Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असेल असे म्हटले जाते.

विवो टी5 प्रो 5G मध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 चिपसेट असेल. हा फोन विवोच्या अँड्रॉइड 16-आधारित ओरिजिनओएस 6 वर चालेल अशी अपेक्षा आहे.

या फोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधा देखील असल्याचे म्हटले जाते. या विवो फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 + IP69+ रेटिंग मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.