TikTok ची कंपनी स्वत:चा स्मार्टफोन आणणार, लवकरच लाँच होण्याची शक्यता

TikTok ची पॅरेंट कंपनी ByteDance आता स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ByteDance आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी अनेक काळापासून तयारी करत आहे.

TikTok ची कंपनी स्वत:चा स्मार्टफोन आणणार, लवकरच लाँच होण्याची शक्यता

मुंबई : TikTok ची पॅरेंट कंपनी ByteDance आता स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ByteDance आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी अनेक काळापासून तयारी करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा स्मार्टफोन लाँच झाल्याच्या अफवाही होत्या. कंपनीने आता या अफवांवर पूर्णविराम लावत फोन लाँच करणार असल्याचं जाहीर केलं.

स्मार्टिसन टेक्नॉलजीशी डील

ByteDance ने आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी चीनच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी स्मार्टिसन टेक्नॉलजीसोबत पार्टनरशिप केली आहे. या डीलमुळे ByteDance ने स्मार्टिसनकडून काही पेटेंट आणि वर्कफोर्सही मिळवला आहे. या कराराचा फायदा स्मार्टफोन बनवण्यासाठी होणार असल्याचा दावा कंपनीने केला.

स्मार्टफोनचं वैशिष्ट्य काय?

सध्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीने अधिक माहिती दिलेली नाही. पण एका चायनीज आउटलेटच्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनला गेल्या सात महिन्यांपासून डेव्हलप केलं जात आहे. या करारानंतर ByteDance या स्मार्टफोनमध्ये त्यांचे अॅप्लीकेशन्स देईल.

ByteDance ही चीनची एक प्रमुख कंपनी आहे आणि टिकटॉक व्यतिरिक्त ही कंपनी न्यूज, म्यूजिक स्ट्रीमिंग अॅपसोबतच अनेक अॅप ऑफर करते.

चीनमध्ये लाँच होणार

टिकटॉकची लोकप्रियता पाहता हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला जाऊ शकतो. मात्र, हा फोन जगभरात लाँच होण्याची शक्यता फार कमी आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये कधी लाँच होणार आहे याबाबत सध्या अधिकृत माहिती नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI