अमेरिकेच्या टॅरिफमुळे आयफोन 17 जास्त किमतीत लाँच होणार? वाचा…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफमुळे यंदा लाँच होणारी आयफोन 17 सीरीज वाढीव किमतीसह लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफमुळे चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफमुळे यंदा लाँच होणारी आयफोन 17 सीरीज वाढीव किमतीसह लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अॅपलचे आयफोन 79900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होत आहेत. तसेच अॅपल सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे आयफोन लाँच करत असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आयफोन 17 सीरीजच्या किमतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या वर्षी आयफोन 17 सीरीज 50 डॉलर्सच्या वाढीव किमतीत म्हणजेच मागील सीरीजपेक्षा सुमारे 4500 रुपये जास्तीच्या किमतीत लाँच केली जाणार आहे. त्यामुळे नवा आयफोन 17 खरेदी करणाऱ्यांना आता अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
आयफोन 17 मॉडेल्स वाढीत किमतीत लाँच होण्याची शक्यता
लीक झालेल्या माहितीनुसार, आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे मॉडेल्स महागड्या किमतीतल लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन 17 हा फोन 89,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होऊ शकतो. तसेच यावर्षी Apple चे iPhones 256GB च्या सुरुवातीच्या स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे फोनची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या नवीन iPhones चे दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त असू शकतात. याचे कारण म्हणजे फोनच्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत, तसेच अनेक कर देखील वाढले आहेत. त्यामुळे नवीन iPhone 17 सीरीज महागड्या किमतीत लाँच होऊ शकते. तसेत या सीरिजनधील Pro मॉडेलची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
ट्रम्प टॅरिफचा परिणाम जाणवणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास सर्वच देशांवर कर लागू केला आहे. त्यामुळे जगभरातील पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे Apple च्या नवीन iPhone 17 सीरीजवर देखील होणार आहेत. कच्चा माल महागल्याने कंपनी फोनची किंमत वाढवू शकते. मात्र iPhone 17 च्या किंमतीत वाढ करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तसेच ही वाढ Pro मॉडेल्समध्ये होण्याची शक्यता आहे, iPhone 17 च्या बेस मॉडेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
