सरकार असावे तर असे, ChatGPT Plus सब्सक्रिप्शन वाटणारा फ्री वाटणारा जगातला पहिला देश
जगात एक असाही देशही आहे जिथे संपूर्ण लोकसंख्येला तेथील सरकार मोठे गिफ्ट देणार आहे. या देशातील नागरिकांना प्रीमियम फीचर्सवाले चॅटजीपीटी प्लस सब्सक्रिप्शन फ्री मिळणारआहे.

OpenAI चा पॉप्युलर एआय टूल चॅट जीपीटी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या कंपनीकडे फ्री आणि पेड दोन्ही सब्सक्रिप्शन प्लान देखील उपलब्ध आहेत. आता तर असेही उघड झाले आहे की एक असाही देश आहे जो लोकांना फ्रीमध्ये चॅटजीपीटीचे प्रीमियम सब्सक्रिप्शन ( ChatGPT Plus Subscription ) वाटणार आहे. कोणता आहे हा देश आणि चॅट जीपीटी प्लसचे मासिक प्लान किती रुपयांना येतो सर्व माहीती एकाच बातमीत वाचूयात….
एआय टूल चॅट जीपीटीचे सब्सक्रिप्शन मोफत वाटण्याची योजना युएई म्हणजे संयुक्त अरब अमिरात लवकरच तेथील नागरिकांना देणार आहे. हा जगातला पहिला असा देश आहे जो संपूर्ण लोकसंख्येला चॅटजीपीटी प्रीमियम व्हर्जन फ्री देणार आहे. या कामासाठी ओपन एआय आणि युएई सरकार दरम्यान पार्टनरशिप देखील झालेली आहे. ज्यात अबू धाबी येथे युएई नावाचा एक मोठा डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार आहे,
UAE
मोफत सब्सक्रिप्शन ओपनएआय आणि यूएई सरकार दरम्यान यासाठी सर्वात मोठी भागीदारी होणार आहे. यातील सर्वात रोमांचक बाब ही की यूएई राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चॅटजीपीटी प्लसचे फ्री एक्सेस मिळणार आहे. दुबईत राहणाऱ्या लोकांना एडव्हान्स एआय टुल्सचा वापर करता येणार आहे. या टुल्सचा वापर करणाऱ्या एक रुपयाही खर्च करण्याची गरज आता राहणार नाही.
या प्रोजेक्टचा हेतू केवळ मोठा डेटा सेंटर तयार करण्याचा नसून याचा हेतू एआयद्वारे लोकांना जवळ आणण्याचा आहे. ChatGPT Plus Subscription चा मासिक प्लानची किंमत 20 डॉलर (सुमारे 1701 रुपये ) इतका आहे.
AI कंप्यूटिंग कल्सटरवर काम चालू आहे
हा प्रोजेक्ट दोन्ही पार्टीसाठी मोठे पाऊल आहे..या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ओपन एआय आणि याचे पार्टनर एक शक्तीशाली 1 गीगावॅट एआय कंप्यूटिंग क्लस्टर बनवण्याचे काम होत आहे.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 200 मेगावॅट तयार होण्याची शक्यता आहे.
एक्सियोसच्या मते, Stargate UAE ओपनएआयचे “ओपनएआय फॉर कंट्रीज” प्रोग्रॅमचा एक भाग आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमैन यांनी या प्रकल्पाला एक बोल्ड व्हीजन म्हटले आहे. एआय बेनिफिट्स सारख्या चांगल्या आरोग्य सेवा, आधुनिक शिक्षण आणि क्लीन एनर्जीला जगभरातील अनेक स्थानांवर आणण्याची योजना आहे. यूएई डीलमध्ये ओरेकल, सिस्को, एनव्हीडिया, जी 42 आणि सॉफ्ट बँक सारख्या मोठ्या कंपन्या सामील आहेत.
