AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही सारखा UPI पिन विसरता? मग हे नवीन अपडेट तुमच्यासाठीच, कसा कराल वापर?

भीम (BHIM) ॲपच्या नवीन बायोमेट्रिक सुविधेमुळे आता युपीआय पिनची गरज उरली नाही. ₹५,००० पर्यंतचे व्यवहार आता केवळ फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकने कसे करायचे, याची सविस्तर माहिती आणि स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया येथे वाचा.

तुम्हीही सारखा UPI पिन विसरता? मग हे नवीन अपडेट तुमच्यासाठीच, कसा कराल वापर?
UPI App
| Updated on: Mar 25, 2026 | 1:19 PM
Share

हल्लीच्या डिजीटल युगात आपण चहाच्या टपरीपासून ते अगदी एखाद्या मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे UPI द्वारे पेमेंट करतो. पण अनेकदा गर्दीत किंवा घाईत असताना UPI पिन टाकणे कठीण जाते. काही वेळा सुरक्षिततेच्या कारणामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी आपला पिन उघड करायचा नसतो. यावर उपाय म्हणून NPCI (National Payments Corporation of India) ने भीम (BHIM) ॲपमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन बायोमेट्रिक फिचर काय?

आतापर्यंत कोणत्याही UPI व्यवहारासाठी साधारण ४ किंवा ६ अंकी पिन टाकणे अनिवार्य होते. मात्र, नवीन अपडेटनुसार, भीम ॲप वापरणारे युजर्स आता त्यांच्या स्मार्टफोनमधील फिंगरप्रिंट स्कॅनर (Fingerprint) किंवा फेस आयडी (Face ID) चा वापर करून व्यवहार पूर्ण करू शकतात. हे फिचर तुम्ही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी वापरता, त्याच प्रमाणे वापरु शकता.

महत्त्वाचे नियम आणि मर्यादा काय?

सध्या या नव्या बायोमेट्रिक फिचरसाठी ५ हजार रुपयापर्यंतच्या व्यवहारांसाठीची मर्यादा लावण्यात आली आहे. जर तुमचा व्यवहार ५,००० पेक्षा जास्त रकमेचा असेल, तर सुरक्षिततेसाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे UPI पिन टाकावाच लागेल. तसेच डेटा सुरक्षितत म्हणून तुमची बायोमेट्रिक माहिती (बोटांचे ठसे किंवा चेहरा) भीम ॲपच्या सर्व्हरवर साठवली जात नाही. ती तुमच्या फोनच्या सिक्युअर एन्क्लेव्हमध्येच राहते, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका नसतो.

हे फिचर कसे सुरु कराल? (Step-by-Step Guide)

  • तुमच्या भीम ॲपमध्ये ही सुविधा सुरू करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
  • सर्वात आधी तुमचे BHIM App अपडेट करा आणि ते ओपन करा.
  • ॲपमधील तुमच्या प्रोफाइल (Profile) आयकॉनवर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या बँक खात्यासाठी ही सुविधा हवी आहे, ते बँक खाते निवडा.
  • तिथे तुम्हाला Biometric Pay किंवा Enable Fingerprint/Face ID असा पर्याय दिसेल.
  • तो पर्याय सुरू करा आणि तुमच्या फोनचा पिन किंवा फिंगरप्रिंट टाका.
  • आता पुढच्या वेळी पेमेंट करताना तुम्हाला Use Biometric असा पर्याय मिळेल.

या सुविधेचे फायदे काय?

या सुविधेमुळे युजर्सला अनेक फायदे मिळणार आहेत. तसेच यामुळे वेगवान व्यवहार करणे शक्य होणार आहे. कोणताही पिन टाईप करण्यापेक्षा बायोमेट्रिक स्कॅन करणे खूप जलद आहे. यामुळे पिन विसरण्याची भीती राहत नाही. अनेकदा ग्राहकांकडे बरीच बँक खाती असल्याने वेगवेगळे पिन लक्षात ठेवणे कठीण जाते. मात्र या नव्या फिचरमुळे आता त्याची गरज उरणार नाही. कोणासमोरही पिन टाकण्याची गरज नसल्यामुळे तुमचा पिन चोरीला जाण्याची किंवा कोणाला दिसण्याची शक्यता पूर्णपणे संपते.

Follow Us
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...
आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX...
सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; फडणवीसांचा नाव
Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात
मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... Video तुफान
Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... व्हिडीओ तुफान व्हयरल
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट...