Vivo Special Offer : स्मार्टफोनची स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार, 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 7:05 AM

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या अनेक सेल्स आयोजित केले जात आहेत, ज्यात तुम्ही विविध कंपन्यांकडून बंपर सवलतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Vivo Special Offer : स्मार्टफोनची स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार, 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स

Follow us on

मुंबई : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या अनेक सेल्स आयोजित केले जात आहेत, ज्यात तुम्ही विविध कंपन्यांकडून बंपर सवलतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. पण आज आम्ही तुम्हाला Vivo च्या अशा ऑफरबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला 10 हजार रुपयांच्या बेनिफिट्ससह मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ची सुविधा देखील मिळेल. (Vivo onam special offer 2021 : free screen replacement and Rs 10000 gift benefits)

चायनीज स्मार्टफोन निर्माता विवोने आपल्या ग्राहकांसाठी Vivo Onam Special Offer सादर केली आहे. यामध्ये कंपनीच्या वतीने ग्राहकांना Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजचे स्मार्टफोन खरेदी केल्यावर 10 हजार रुपयांचे बेनिफिट्स दिले जात आहेत आणि स्क्रीन खराब झाल्यास किंवा फुटल्यास मोफत बदलण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. ही ऑफर 11 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 23 ऑगस्टपर्यंत चालेल. याव्यतिरिक्त, या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना कार्ड ऑफर, ईएमआय ऑफर, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅकअप, स्मार्टफोन खरेदीवर एक्सटेंडेड वॉरंटी यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत.

वन टाइम Screen Replacement सह कॅशबॅकदेखील मिळणार

या ऑफर अंतर्गत, जर तुम्ही Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजचे स्मार्टफोन खरेदी केले तर तुम्हाला वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा 6 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह हे स्मार्टफोन खरेदी केल्यावर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय, बजाज फिनसर्व ट्रिपल झिरो ईएमआय योजनेअंतर्गत तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, तुम्ही हे स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआयवरदेखील खरेदी करू शकता आणि 10 हजार रुपयांच्या जिओ बेनिफिट्सचा लाभदेखील घेऊ शकता.

6 महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी आणि अश्योर्ड गिफ्टची सुविधा

या व्यतिरिक्त, कंपनी या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदीवर एक अश्योर्ड गिफ्ट देखील देत आहे, ज्यामध्ये आपण मोफत बॅकपॅक मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रोडक्ट खरेदी करावे लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रोडक्ट खरेदी केले तर तुम्हाला 6 महिन्यांच्या एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ मिळेल. यामध्ये 25 ऑगस्टपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी ऑफरचा लाभ घेता येईल. या सर्व ऑफर मेन लाइन चॅनेलद्वारे उपलब्ध केल्या जात आहेत.

इतर बातम्या

Hiring Trends 2021 : डार्व्हिन बॉक्सचे सहसंस्थापक म्हणतात, सध्या सर्वांचं लक्ष केवळ प्रोफेशनल जॉब्सकडे

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

(Vivo onam special offer 2021 : free screen replacement and Rs 10000 gift benefits)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI