108 MP बॅक आणि डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत…

Vivo S12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. 256GB UFS 3.1 स्टोरेज देखील आहे आणि 4,200mAh बॅटरी आहे जी 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

108 MP बॅक आणि डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत...
Vivo S12 series
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 1:32 PM

मुंबई : Vivo ने चीनमध्ये आपली लेटेस्ट सिरीज Vivo S12 लाँच केली आहे. यात Vivo S12 आणि Vivo S12 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. दोन्ही विवो हँडसेट 108 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यांसह येतात. हे दोन्ही फोन MediaTek Dimension SoCs वर काम करतात आणि दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केले जातात. Vivo S12 आणि S12 Pro तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केले गेले आहेत आणि या दोन्हीमध्ये 44W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. हे फोन भारतात डेब्यू करतील की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही सिरीज पुढच्या वर्षी भारतात सादर केली जाऊ शकते. (Vivo S12, Vivo S12 Pro sale live from today)

Vivo S12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. 256GB UFS 3.1 स्टोरेज देखील आहे आणि 4,200mAh बॅटरी आहे जी 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo S12 Pro मध्ये Vivo S12 सारखे बरेच स्पेसिफिकेशन्स आहेत.

Vivo S12, Vivo S12 Pro ची किंमत

Vivo S12 ची किंमत 8GB + 256GB ऑनबोर्ड स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 2,799 (33,100 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 2,999 (35,500 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. Vivo S12 Pro च्या 8GB + 256GB स्टोरेज हँडसेटसाठी CNY 3,399 (40,200 रुपये) मोजावे लागतील आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज हँडसेटसाठी CNY 3,699 (43,700 रुपये) इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन सध्या Vivo चायना वेबसाइटवर ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर पर्यायांमध्ये सूचीबद्ध आहेत. हे Vivo फोन आजपासून (31 डिसेंबर) खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Vivo S12 चे स्पेसिफिकेशन्स

Dual-SIM (Nano) Vivo S12 Android 11-आधारित OriginOS Ocean वर चालतो. फोनमध्ये 6.44 इंचांचा फुल-एचडी+ (1,080×2,408 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे जो 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 91.01 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह येतो. स्क्रीनमध्ये 90Hz रिफ्रेश दर, 180Hz सॅम्पलिंग रेट आणि 408 ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. हुड अंतर्गत, Vivo S12 मध्ये 12GB पर्यंत LPDDR4x रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 1100 SoC पॅक आहे.

Vivo S12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. जे 2x ऑप्टिकल आणि 20x डिजिटल झूम ऑफर करते. f/2.2 लेन्ससह 8 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर आणि f/2.4 लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, हँडसेटमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे जो f/2.0 लेन्ससह 44 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि f/2.28 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सेल सेन्सरने हायलाइट केला आहे.

Vivo S12 मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज पॅक आहे आणि 4,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/A-GPS, USB Type-C आणि NFC यांचा समावेश आहे.

Vivo S12 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo S12 Pro मध्ये Vivo S12 सारखे बरेच स्पेसिफिकेशन्स आहेत. हा एक ड्युअल-सिम (नॅनो) स्मार्टफोन आहे जो Android 11-आधारित OriginOS Ocean वर चालतो. फोनमध्ये 6.56 इंचांचा फुल-एचडी+ (1,080×2,376 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेशो आणि 91.39 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह आहे. स्क्रीनमध्ये 90Hz रिफ्रेश दर, 240Hz सॅम्पलिंग रेट आणि 398 ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. Vivo S12 Pro मध्ये 12GB पर्यंत LPDDR4x रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 1200 SoC पॅक आहे.

Vivo S12 Pro मध्ये Vivo S12 प्रमाणेच बॅक कॅमेरा कॉन्फिगरेशन आहे, तथापि, फ्रंट कॅमेरा सेटअपमध्ये फरक आहे. प्रो व्हिरिएंटमध्ये f/2.0 लेन्ससह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.28 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सेल सेन्सर येतो. दोन्ही स्मार्टफोन फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ कॅप्चर करू शकतात. याशिवाय, दोन्ही हँडसेटमधील फ्रंट कॅमेरा सेटअपमध्ये ऑटोफोकस आणि अँटी-शेक फीचर आहे.

Vivo S12 Pro मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज पॅक ऑफर करण्यात आला आहे. तसेच यात 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, USB Type-C आणि NFC यांचा समावेश आहे. ग्राहकांना एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट, गायरो, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांसारखे सेन्सर्स मिळतील.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(Vivo S12, Vivo S12 Pro sale live from today)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.