विवोने लॉन्च केला फोल्डेबल फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सॅमसंगनंतर आता विवोनेही भारतात फोल्डेबल फोन लाँच केला आहे. एक्स फोल्ड 5 हा विवोचा पहिला फोल्डेबल फोन आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

तुम्ही नवा फोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगनंतर आता विवोनेही भारतात फोल्डेबल फोन लाँच केला आहे. एक्स फोल्ड 5 हा विवोचा पहिला फोल्डेबल फोन आहे. हा एक सिंगल स्टोरेज व्हेरिएंट फोन आहे. यात 16 जीबी रॅम + 521 जीबी स्टोरेज आहे. हा फोन टायटॅनियम ग्रे या सिंगल कलर ऑप्शनमध्ये येतो. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
Vivo X Fold 5 मधील फीचर्स
Vivo X Fold 5 मध्ये 8.03 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले मिळतो, तसेच यामध्ये 6.53 इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. असेल. हे दोन्ही डिस्प्ले AMOLED पॅनेलसह येतात. फोल्डेबल स्क्रीनचे रिझोल्यूशन 2480 x 2200 पिक्सेल आहे. तर कव्हर डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2748 x 1172 पिक्सेल आहे. हे दोन्ही डिस्प्ले 4500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.
6000 एमएएचची बॅटरी
विवोचा हा फोल्डेबल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरवर काम करतो. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित FountouchOS वर काम करतो. यात 6000 एमएएचची बॅटरी मिळते, हा फोन 80W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
कॅमेरा
Vivo X Fold 5 या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50 MP चा मेन OIS कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाइड आणि 50 MP चा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कव्हर आणि मेन डिस्प्लेमध्ये 20 MP चा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
किंमत किती?
विवोच्या या फोल्डेबल फोनची किंमत 1,49,999 रुपये आहे. भारतात याची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. हा फोन 30 जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनवर 15000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळू शकतो. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास 15000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो.
